फायर आॅडिट नसलेल्या इमारतींना मनपाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:19 PM2019-01-23T23:19:42+5:302019-01-23T23:20:03+5:30

व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आदी इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने इमारतींच्या फायर आडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. शहरातील सर्व इमारतींना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून ज्या इमारत मालकांनी फायर आडिट करवून घेतले नाही, अशा इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Notice to municipalities without fire audited buildings | फायर आॅडिट नसलेल्या इमारतींना मनपाची नोटीस

फायर आॅडिट नसलेल्या इमारतींना मनपाची नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन गंभीर : अन्यथा वीज व पाणी पुरवठा खंडित करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आदी इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने इमारतींच्या फायर आडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. शहरातील सर्व इमारतींना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून ज्या इमारत मालकांनी फायर आडिट करवून घेतले नाही, अशा इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
चंद्रपूर शहरात हजारो व्यवसायिक मालमत्ताधारक आहेत. याशिवाय सार्वजनिक व शसाकीय कार्यालयदेखील आहेत. या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिननियम २००६ अंतर्गत व्यावसायिक मालमत्ताधारकांनी त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी प्रभावीरित्या कार्यक्षम आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. याकरिता दर सहा महिन्यातून एकदा अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करून घेणे कायदेशरित्या बंधनकारक आहे. मात्र चंद्रपूर शहरातील बहुतांश व्यावसायिक मालमत्ताधारकांनी अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करून घेतलेले नाही. त्यामुळे याबाबत मनपाने आपल्या हद्दीतील सर्व व्यवसायिक मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे.
शहरातील बऱ्याच व्यावसायिक मालमत्ताधारकांनी आपल्या व्यावसायिक ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा स्थापित केलेली नाही. त्यामुळे अशा इमारतधारकांनी लवकरात लवकर अग्निरोधक यंत्रणा बसवून घ्यावी. तसेच ज्या इमारतीनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल, त्यांनी ते करून घ्यावे, अशा सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत. आग प्रतिबंध जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट, रूग्णालये, शैक्षणिक इमारत, बहुमजली शाळा व महाविद्यालय, व्यावसायिक इमारती, औद्योगिक इमारती, गोदामे तसेच १५ मीटरपेक्षा उंच रहिवासी इमारती व सर्व प्रकारच्या समीश्र वापराच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे आणि दरवर्षी त्याचे फायर आॅडीट करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची यंत्रणा बसविल्यानंतर दरवर्षी जानेवारी व जुलै अशा सहा महिन्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ती यंत्रणा कार्यक्षम असल्याचा दाखला घेणे बंधनकारक आहे.
२८ फेब्रुवारीच्या आत ज्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसेल त्यांनी ती बसवून घ्यावी. तसेच ज्या इमारतींनी सक्षमता प्रमाणपत्र घेतले नसेल, त्यांनी ते करून घ्यावे. २८ फेब्रुवारीच्या आत कार्यवाही न केल्यास थेट सदरच्या इमारती वापरण्यायोग्य नसल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच महाराष्टÑ आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच कायद्यामध्ये नमुद असलेल्या इतर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने नोटीसमधून दिला आहे.
व्यावसायिकांचे दुर्लक्ष
वर्षातून दोनदा फार्म बी व वार्षिक आॅडीट करणे बंधनकारक आहे. याबाबत व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास बाहेरून अग्निशमन यंत्रणा मदतीसाठी येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता येत नाही. यात अनेकदा मोठे नुकसान होते. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत.

Web Title: Notice to municipalities without fire audited buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.