मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:57 PM2018-03-13T23:57:58+5:302018-03-13T23:57:58+5:30

२०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.

Municipal budget of 402 crores | मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प

मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प

Next
ठळक मुद्देविरोधकांचा आक्षेप : स्थायी समितीकडून २०.३५ कोटींच्या कामांची शिफारस

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : २०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. हा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असला तरी याला विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे.
आयुक्त काकडे यांनी सादर केलेल्या ४०२ कोटींच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची मनपाची बचत दाखविण्यात आली आहे. तर संपती करासहीत अन्य कराच्या माध्यमातून ५८.२३ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित असून २३९ कोटी रूपये सरकारकडून अनुदान स्वरूपात अपेक्षित असल्याची माहिती मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेता वसंता देशमुख, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, मुख्य वित्त अधिकारी गजानन बोखडे आदी उपस्थित होते.
माहिती देताना राहुल पावडे म्हणाले, मनपा अर्थसंकल्पात पालकमंत्री प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांना मदत केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिला व पुरूषांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय बांधकाम करण्यात येणार असून यासाठी ३० लाख रुपये तर पालकमंत्री धनलक्ष्मी योजने अंतर्गत ‘सब पढे, सब बढे’, ‘स्कूल चले हम’ मिशन, पालकमंत्री शुध्द पेयजल व शिष्यवृत्ती योजनेसाठी ५० लाखांची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला बचत गटांसाठी रोजगार संमेलन व मंच स्थापित करण्यासाठी ३० लाख, कर्मचाºयांच्या प्रशिक्षणासाठी १० लाख, शहरातील मटन, मच्छी, चिकन मार्केटच्या विकासासाठी १ कोटी, कांजी हाऊससाठी ५० लाख, महत्त्वपूर्ण मोठे पूल बांधण्यासाठी १ कोटी, आरोग्य केंद्राच्या विकासासाठी १ कोटी, मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौºयासाठी ३० लाख, मनपा झोन कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी ५० लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात असल्याची माहिती सभापती पावडे यांनी दिली.
ऐतिहासिक संग्रहालय उभारणीसाठी २० लाख, स्वर्गरथ वाहनाच्या खरेदीसाठी १५ लाख, सराई मार्केट विकासासाठी ७ कोटी, मनपा कामकाजाची माहिती पुस्तिका छपाईसाठी ५ लाख, महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ३० लाख, मनपाच्या योजनांचा प्रचार, प्रसारासाठी ३० लाख, मनपा क्षेत्रात सामाजिक कार्य करणाºया नागरिकांना सन्मानित करण्यासाठी १० लाख, समाज प्रबोधन संमेलनासाठी १० लाख, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यासाठी १० लाख, विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन वितरीत करण्यासाठी १० लाख, कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी १० लाख, महिलांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण कामाकरिता ५० लाख, महापौर, सभापती जनता दरबार कार्यक्रमासाठी ५ लाख, दिव्यांगाचे विवाह संमेलन आयोजनासाठी ३० लाख तसेच शहरातील चार चौकांचे सौंदर्यीकरणासाठी ७० लाख रूपये अशा २०.३५ कोटींच्या कामांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे सभापती पावडे यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांनाही खर्चासाठी तरतूद
अर्थसंकल्पात महापौर, सभापती यांच्या आकस्मिक खर्चासाठी ५० लाख, मनपा पदाधिकारी आकस्मिक खर्चासाठी १० लाख, मनपा आपत्कालीन खर्चासाठी १० लाख, महापौर, सभापती सहायता कल्याण निधीसाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता, राहुल पावडे यांनी आपत्कालीन खर्च गरजूंना मदतीसाठी ठेवण्यात आला आहे. अनेकदा मदतीची इच्छा असतानाही आर्थिक तरतूद नसते, असे सांगितले.
महिलांना कराटे व ड्रायव्हिंग प्रशिक्षण
महापौर तेजस्वी अभियानासाठी ५० लाख रुपयांची शिफारस स्थायी समितीने केली आहे. या निधीतून शहरातील युवती व महिलांना आत्मरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण तसेच ड्रायव्हींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापौर तक्रार निवारण केंद्राची उभारणी
मनपा अर्थसंकल्पात महापौर तक्रार निवारण केंद्रासाठी २५ लाखांची शिफारस करण्यात आली आहे. या केंद्रात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचा लवकर निपटारा होण्यास मदत होईल, असे पावडे यांनी म्हटले.

कोणत्याही नगरसेवकांच्या सूचना, दुरूस्ती ऐकून न घेता आयुक्तांनी स्थायी समितीत बजेट सादर केला. राष्ट्रीय लेखा संहिता पद्धतीने बजेट सादर होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बजेटमध्ये अनेक चुका व घोळ असून यावर आपला आक्षेप आहे.
- नंदू नागरकर, नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती.

Web Title: Municipal budget of 402 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.