पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:52 PM2019-01-16T22:52:53+5:302019-01-16T22:53:17+5:30

शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सभागृहाबाहेर येते निषेध व्यक्त केला.

Mayor's efforts to support water supply contractor | पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न

पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देविशेष सभा : विरोधकांनी निषेध करून आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सभागृहाबाहेर येते निषेध व्यक्त केला.
यापूर्वी झालेल्या आमसभेमध्ये पाणीप्रश्नावर गदारोळ झाला होता. पाणीपुरवठा कंत्राटदार योगेश समरित व अमृतचे कंत्राटदार यांना सभागृहात पाचारण करून जाब विचारण्याचे मागील एका आमसभेमध्ये ठरविण्यात आले होते. यानंतर अमृतच्या कंत्राटदाराने सभागृहात हजेरी लावून सभागृहातील सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र पाणीपुरवठा कंत्राटदार समरित वारंवार बोलावूनसुद्धा त्यांनी सभागृहात येण्याचे टाळले. यामुळे सभागृहाचा अवमान होत असल्याची बाब मागील आमसभेमध्ये सभागृहातील नगरसेवकांनी लक्षात आणून दिली. पाणीपुरवठा समस्येवर विशेष सभा घेण्याचे निश्चित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका मागील आमसभेमध्ये नगरसेवक पप्पू देशमुख यांनी घेतली होती. त्यानंतर आमसभेत १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पाणी पाण्याच्या समस्येवर विशेष सभा घेण्याचे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले होते. त्यानुसार आज बुधवारी पाणी समस्येवर विशेष सभेचे आयोजन केले असता महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे दुपारी १.४५ वाजेपर्यंत सभागृहात न पोहोचल्यामुळे विरोधकांचा तिळपापड झाला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातच निषेध करीत सभात्याग केला व सर्व विरोधक महानगरपालिका इमारतीसमोर एकत्रित झाले. या ठिकाणी नारेबाजी करीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्धार केला.
जेव्हा कंत्राटदार आले, तेव्हा महापौरच आल्या नाहीत
पाणीपुरवठा कंत्राटदाराला बोलावल्यानंतरही त्याने सभागृहात येण्याचे टाळले. मात्र आजच्या सभेत कंत्राटदार योगेश समरित वेळेच्या आधी सभागृहामध्ये येऊन असताना व पाणीपुरवठ्यावर विशेष सभेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असताना ऐन वेळेवर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती आले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पाण्याच्या समस्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. सत्ताधाºयांनी नागरिकांना वाºयावर सोडले. केवळ कंत्राटदाराचा बचाव करण्यासाठी पदाधिकारी अनुपस्थित राहिले, असा आरोप विरोधकांनी केला. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर, शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख, नगरसेविका सुनिता लोढिया, नगरसेवक कुशल पुगलिया, नगरसेवक दीपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे, अशोक नागपुरे, सकीना अन्सारी, विना खनके, अमजद अली, मंगला भोयर, देवेंद्र बेले व पुष्पा मून उपस्थित होते.

Web Title: Mayor's efforts to support water supply contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.