कोरेगाव भीमा हल्ला एक षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:46 PM2018-02-11T23:46:28+5:302018-02-11T23:46:43+5:30

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे मनुवाद्याचे षडयंत्र असून समाजा-समाजात भांडण लावण्याचा पूर्व नियोजित कट होता.

Koregaon Bhima attack is a conspiracy | कोरेगाव भीमा हल्ला एक षडयंत्र

कोरेगाव भीमा हल्ला एक षडयंत्र

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सावली येथे भीमशक्ती संघटनेतर्फे राज्यस्तरीय युवा महोत्सव

आॅनलाईन लोकमत
सावली : १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे मनुवाद्याचे षडयंत्र असून समाजा-समाजात भांडण लावण्याचा पूर्व नियोजित कट होता. असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
सावली येथील भीमशक्ती युवा संघटनच्या वतीने दोन दिवसीय राज्य स्तरीय युवा महोत्सव स्थानिक नगर पंचायतच पटांगणावर नुकताच पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य. अ‍ॅड. राम मेश्राम, पी.पी. शेंडे, नगरपंचायतचे गटनेचे छत्रपती गेडाम, शेतकरी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, नगरसेवक संदीप पुण्यपकार, नगरसेविका निलम सुरुमवार, काँग्रेसचे युवा नेते निखिल सुरमवार, पं.स.सदस्य विजय कोरेवार आदी उपस्थित होते.
आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपाने मोठ्या प्रमाणात नोकर भरती राबविण्याचे आश्वसन दिले. मात्र आता पकोडे विकण्याची वेळ या सरकारने लावली आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण या परिसरात उस कारखाना निर्माण करण्यास प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शुक्रवारी राज्यस्तरीय एकल नृत्य व तालुका स्तरीय समूह नृत्य स्पर्धा तर शनिवारी राज्यस्तरीय समूह नृत्य, राजस्तरीय चित्रकला व तालुका स्तरीय एकल नृत्य स्पर्धा पार पडली.
राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेमध्ये आम्रपाली गृप नागपूर यांनी प्रथम, जये अम्बे गृप वणी व फस्ट डेस्टीनेशन गृप हिंगणघाट यांनी द्वितीय, डी.वायरस गृप चार्मोशी तृतीय, जे.डी.गृप बल्लारपूर, चतुर्थ, तर पाचवे पारितोषिक स्टेज मेकर गृप चंद्रपूर यांनी पटकाविला तर राज्यस्तरीय एकल नृत्य स्पर्धेत प्रथम जय कैथवास, नागपूर, द्वितीय पवन पंधरे, वणी, तृतीय अक्षय कावडे सिंदेवाही व पूजा मडावी चंद्रपूर, चतुर्थ सुनिल पिंपळकर तालुका स्तरीय एकल नृत्य स्पर्धेत आशिष तिग्गलवार प्रथम, अवंती दुधे द्वितीय, अदिती शंभरकर तृतीय तर तालुका स्तरीय समूह नृत्य स्पर्धेत प्रथम डी. के . बाईज गृप सावली, द्वितीय आरएमजीएम महाविद्यालय सावली, तृतीय जि. प. शाळा चकविरखल, तर चित्रकला स्पर्धेत प्रथम उपम दुधे, द्वितीय दिव्या मेश्राम चंद्रपूर, तृतीय इंजि सहारा मेश्राम यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक चंद्रकात गेडात तर संचालन छन्नुपाली डोहणे केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल बोरकर सचिव पुष्पकांत बोरकर, अमित दुधे, सोनू बोरकर, अमोल गेडाम, अभिषेक गेडाम, प्रशांत खोब्रागडे, अमू बोरकर उपस्थित होते.

Web Title: Koregaon Bhima attack is a conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.