आमदार व प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गाची संयुक्त पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:32 AM2017-07-25T00:32:35+5:302017-07-25T00:32:35+5:30

बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-कोरपना राज्य सीमेपर्यंत मंजूर राष्ट्रीय महामार्ग संबंधी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी राजुरा....

A joint survey of the National Highway by the MLAs and territorial authorities | आमदार व प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गाची संयुक्त पाहणी

आमदार व प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गाची संयुक्त पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-कोरपना राज्य सीमेपर्यंत मंजूर राष्ट्रीय महामार्ग संबंधी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी राजुरा येथे संयुक्त पाहणी केली.
यावेळी घोषित राष्ट्रीय महामार्गासंबंधी राजुराचे आ. अ‍ॅड. संजय धोटे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपूरचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर, प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार, मुकेश असोशिएट कंपनीचे अधिकारी व्ही. पी. सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मुकेश टांगले, सतीश धोटे, नगरसेवक राधेशाम, सुरेश धोटे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, दिलीप वांढरे,, गणेश रेकलवार उपस्थित होते. या दोन्ही महामार्गावर वाहतूक जास्त असल्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना येथील प्रस्तावित बायपास संबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. वर्धा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम, रेल्वे क्रासिंग वरील उड्डान पूल आणि राजुऱ्यातील सिमेंट रस्ता याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: A joint survey of the National Highway by the MLAs and territorial authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.