शेतकºयांच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:07 AM2017-11-01T01:07:28+5:302017-11-01T01:09:02+5:30

जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,

Implement the schemes of farmers | शेतकºयांच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा

शेतकºयांच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : कृषी, मत्स्य, उमेद, आत्मा आदी विभागाची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहेत.
शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित बैठकीमध्ये त्यांनी कृषी, मत्स्यविभाग, आत्मा, उमेद आदी विभागांच्या अधिकाºयांशी चर्चा केली. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून शाश्वत शेतीचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे दीर्घकालीन परिणाम करणाºया योजनांच्या संदर्भात जागरुकतेने लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार, शेततळे, विविध योजनेतून बंधारे, नाला खोलीकरण आदी योजना शेतकºयांना कायम मदत करणाºया असून याकडे आवर्जून लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयात फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनाक्रमांची चौकशी करुन ज्यांची जीवीतहाणी झाली असेल अशांच्या कुटुंबियांना शासकीय मदत तातडीने मिळेल, असे प्रयत्न करावे, असे ना. अहीर यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिवदास, जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे, साहायक संचालक मगर, जिल्हा मत्स्य अधिकारी जांबुळे यांच्यासह पं.स.सदस्य महेश टोंगे, प्रवीण ठेंगणे, राहुल सराफ, विजय वानखेडे, नरेंद्र जीवतोडे आदी उपस्थित होते.
बोगस विक्रीवर नजर ठेवा
औषधी व बियाणे विकी करताना बंदी घातलेल्या व चुकीच्या बियाण्यांची विक्री होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा. कठोर कारवाई करा, शेतकºयांना यासाठी भुर्दड बसता कामा नये, असेही ना. अहीर यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Web Title: Implement the schemes of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.