दीडशे कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:30 AM2017-07-25T00:30:13+5:302017-07-25T00:30:13+5:30

मोहबाळा गावालगत असणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी मागील आठ वर्षांपासून वीज निर्मितीचे काम करीत आहे.

Hundreds of workers are not allowed to enter the company | दीडशे कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी

दीडशे कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी

googlenewsNext

साई वर्धा पॉवर येथील प्रकार : प्रहारच्या नेतृत्वात निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मोहबाळा गावालगत असणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी मागील आठ वर्षांपासून वीज निर्मितीचे काम करीत आहे. सदर कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सहकंपन्या कार्यरत आहेत. यातील चेन्नई राधा या कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्कॉटेक नावाची कंपनी त्या कंपनीच्या जागेवर काम करणार आहे. मात्र ही कंपनी जुन्या कंपनीत कार्यरत कामगारांना मुलाखती घेऊन कामावर ठेवणर आहे. तशी नोटीस इन्कॉटेक कंपनीने कंपनीच्या नोटीस बोर्ड लावण्यात आली होती. मात्र कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलैपासून कामगारांना कंपनीत प्रवेश बंदी करण्यात आल्याने कामगारात रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, आज सोमवारी कंत्राटी कामगारांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून १५० कामगार कंपनी बाहेर असून कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कंपनीत प्रवेश बंदी केली. हे काम बेकायदेशीर असून सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, असे निवेदनात लिहिले आहे. २००९ पासून हे सर्व कामगार चेन्नई राधा या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून स्थायी काम करीत आहे. या काळात अनेक कंत्राट बदलले. पण कामाचे स्वरूप तेच राहायचे. पण यावेळी नवीन आलेल्या इन्कॉटेक कंपनीने कामगारांना सरसकट कंपनीत प्रवेश बंदी केली. यामुळे कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पूर्ववत कामावर न घेतल्यास व योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी निवेदनातून दिला आहे.

चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दिला चोप
२१ जुलैला कामगारांना कंपनीत प्रवेशबंदी केल्यानंतर सर्व कामगारांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरु असताना कंपनीतील सुरक्षा रक्षक चित्रीकरण करीत असल्याचे एका कामगाराच्या निदर्शनास आले. त्याला याबाबत कामगारांनी विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास पाठविले, असे सांगताच संतप्त कामगारांनी त्याला चांगलाच चोप दिला. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंदणी केली.

Web Title: Hundreds of workers are not allowed to enter the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.