हजारो विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:16 PM2018-06-22T23:16:58+5:302018-06-22T23:17:16+5:30

जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्याचा कथित पारदर्शी निर्णय यंदाही कागदावरच राहण्याची चिन्हे दिसत आहेत़ समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला ४ कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ येत्या मंगळवार (दि़ २६ ) पासून शाळा सुरू होणार आहे़ मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या आनंदी बालमनाचा हिरमोड झाला आहे़

Happen on the joy of thousands of students | हजारो विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण

हजारो विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण

googlenewsNext
ठळक मुद्देजि़पक़डे निधीच नाही : गणवेशाविनाच वाजणार शाळांची घंटा

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्याचा कथित पारदर्शी निर्णय यंदाही कागदावरच राहण्याची चिन्हे दिसत आहेत़ समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला ४ कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ येत्या मंगळवार (दि़ २६ ) पासून शाळा सुरू होणार आहे़ मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या आनंदी बालमनाचा हिरमोड झाला आहे़
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना थेट गणवेश न देता त्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम देण्याची योजना राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षापासून सुरू केली़ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत सर्वच समुदायातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषदांनी राज्य शासनाच्या निधीव्यतिरिक्त पर्यायी मार्ग शोधण्याचेही निर्देश देण्यात आले होते़ चंद्रपूर जिल्हा परिषदेने आर्थिक पर्याय उभे करून सर्वांना गणवेश देण्याचा दावा केला होता़ परंतु, मागील सत्रात शेकडो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला़ शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात आली होती़ पाल्यांच्या वाट्याला उपेक्षा येवू नये़ शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा आत्मविश्वास कायम राहावा, यासाठी पाल्यांनी पदरमोड करून गणवेश खरेदी केले होते़ यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू व्हायला अवघे चार दिवस शिल्लक असताना जि़ प़ ने राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीवरच मदार ठेवली़
त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून नवा गणवेश परिधान करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालमनाला यंदाही हिरमुसण्याची वेळ येणार आहे़
योजनेच्या स्वरूपाविषयी संभ्रम
जि़ प़ शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेला शालेय गणवेशाची रक्कम शासनाकडून दिली जात होती़ पालकांनी गणवेश खरेदी केल्याचे बिल दाखविल्यानंतर मुख्याध्यापकांकडून संबंधित रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत वापरण्यात आली होती़ या पद्धतीविषयी राज्यातील काही जागृत पालकांनी आक्षेप नोंदविल्याने सुधारीत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे़ नवा आदेश नसल्याने रक्कम वाटपासंदर्भात सध्या काही सांगता येणार नाही, असेही बोलले जात आहे़
निधी आल्यानंतरच वाटप करू
शालेय गणवेशाचा निधी अद्याप मिळाला नाही़ गणवेश वाटपाचे स्वरूप मागील सत्राप्रमाणेच राहणार आहे़ निधी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वळते करण्यात येईल़
-प्रकाश लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Happen on the joy of thousands of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.