वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

By admin | Published: April 8, 2017 12:45 AM2017-04-08T00:45:23+5:302017-04-08T00:45:23+5:30

पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या ...

The half-naked front of one thousand project workers against WikiLeaks | वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

Next

सुभाष धोटे : प्रकल्पग्रस्तांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार
राजुरा : पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या वेस्टन कोलफील्ड लिमिटेडविरोधात तापलेल्या उन्हात एक हजार महिला--पुरुषांचा मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चा मुख्य मार्गानी निघाला.
राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने, बाळू जुल्मे, विलास घटे, महेश गाडगे, राजू मोहारे, बालाजी कुबडे, बालाजी पिंपळकर, राजू पिंपळकर, दिनेश वैरागडे, सतीश बानकर, रवी बोबडे, दिलीप नरड, रवी बेले, आकाश चन्ने, नितीन भटारकर, दीपक खनके आदी उपस्थित होते.२०११ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. सेक्शन अकरामुळे शेतीचा कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. जमिनीचा सातबारा असतानासुद्धा हलाखीचे जीवन जगत आहे.
वेकोलिच्या विरोधात १ हजार ८० प्रकल्पग्रस्त विविध आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीनी हिसकावल्या. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करण्यास शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकल्पग्रस्तांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. यापूर्वी वेकोलिचे अधिकारी डॉ. सजीवकुमार, आनंद आझमी, एम. येलय्या, एम.पी. नवले, तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सभा घेतली. ३१ मार्चला बोर्ड आॅफ डायरेक्टरची सभा घेऊन प्रकल्पाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय गृहमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा असून मागील पाच वर्षापासून शेतकरी नोकरीपासून वंचित असल्याने मोठे नुकसान झाले आहे. न्याय न मिळाल्यास खदान बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार
मागील पाच वर्षांपासून राजुरा तालुक्यातील धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील १ हजार ८० प्रकल्पग्रस्त सतत लढा देत असून यापुर्वी आमरण उपोषणसुद्धा केले होते. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून काँग्रेसतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. शेकडो शेतकरी भर उन्हात आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. केवळ आश्वासन देवून चालणार नाही. प्रत्यक्षात कृती करा अन्यथा काँग्रेस मोठे आंदोलन उभे करील, असेही माजी आमदार धोटे यांनी बजावले आहे.

Web Title: The half-naked front of one thousand project workers against WikiLeaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.