ट्रकचालकांना एचआयव्हीवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:51 PM2017-08-22T23:51:17+5:302017-08-22T23:51:41+5:30

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनच्यावतीने आवाळपूर सिमेंट वर्क्सअंतर्गत लॉजीस्टिक डिपार्टमेंटमधील चालकांकरिता एच.आय.व्ही.एड्स याविषयी मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले.

Guide to truck drivers on HIV | ट्रकचालकांना एचआयव्हीवर मार्गदर्शन

ट्रकचालकांना एचआयव्हीवर मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देलॉजीस्टिक डिपार्टमेंटमधील चालकांकरिता एच.आय.व्ही.एड्स याविषयी मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनच्यावतीने आवाळपूर सिमेंट वर्क्सअंतर्गत लॉजीस्टिक डिपार्टमेंटमधील चालकांकरिता एच.आय.व्ही.एड्स याविषयी मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना उपप्रबंधक संजय पेठकर म्हणाले, एचआयव्ही एडस या आजारावर औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंधाच्या आधारानेच यावर आळा घालता येवू शकतो. या आजाराची कुठलीही लक्षणे दिसत नसल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणाला आपल्याला याचे निदान कळते. परंतु, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर निघून गेलेली असते. केवळ दुर्लक्ष केल्यामुळे देखील एचआयव्हीची लागन होत शकते. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असेल, व अशावेळी त्याला देण्यात आलेले रक्त हे शासकीय मान्यता प्राप्त रक्तपेढीतून न घेता खासगी रक्तपेढीतून घेतले गेले असेल तर अनावधानाने त्याला एचआयव्हीची लागण होवू शकते. म्हणूनच स्वत:साठी व आपल्या परिजनासाठी एचआयव्हीची तपासणी करणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारे संकोच न करता स्वयंप्रेरणेने एचआयव्हीची तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. राजेश काटोले यांनी एचआयव्ही एड्स हा आजार इतर आजारापेक्षा वेगळा कसा आहे. यासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे या आजाराची कारणे त्याची लक्षणे व या आजारावर कशाप्रकारे आळा घालता येतो यासंबंधी मार्गदर्शन केले. एचआयव्हीची लागण होण्याचा धोका अधिक असतो, परंतु गुप्तरोग बरा होवू शकतो, त्यावर औषधोपचार उपलब्ध आहे. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित लाभार्थ्यांच्या मनात निर्माण होणाºया शंकाचे निरसन करण्याचे काम देखील यावेळी करण्यात आले. सोबतच या आजाराविषयी लोकांच्या मनात असणारे समज गैरसमज यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.
ज्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली आहे. त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता त्याला आपुलकीच्या भावनेने वागवावे. आजाराविषयी योग्य ते मार्गदर्शन करावे, आपण जर त्यांना प्रेमाची वागणूक दिली तर निश्चितच ते देखील औषधोपचाराच्या सहाय्याने सामान्य माणसासारखे दीर्घ आयुष्य जगू शकतात. या कार्यक्रमामध्ये एकूण ५८ ट्रक चालक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये गुज्जलवार, नाफाडे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश मालेकर तसचे कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.
 

Web Title: Guide to truck drivers on HIV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.