वरोरा जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:06 PM2018-06-30T23:06:41+5:302018-06-30T23:06:57+5:30

जिल्ह्यासाठी अनुकूल असे वातावरण वरोरा शहरात असल्याने वरोरा जिल्हा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

The Guardian Minister for the Warora district | वरोरा जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

वरोरा जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

Next
ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी : वरोराच मध्यवर्ती ठिकाण

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : जिल्ह्यासाठी अनुकूल असे वातावरण वरोरा शहरात असल्याने वरोरा जिल्हा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वरोरा जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. वरोरा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असताना संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करुन आपल्या मागणीचे निवेदन दिले.
वरोरा शहर जिल्ह्याच्या दृष्ट्रीने मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच शहरात प्रशासकीय कार्यालयासाठी सुसज्ज इमारत, शासकीय जमीन, चारही दिशेला जोडणारी मुख्य रेल्वे लाईन, चौपदरी रस्ता, तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा वरोरा शहरात उपलब्ध आहेत. परिणामी वरोरा शहराला जिल्हा घोषित करताना अत्यल्प खर्च येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाचे विभाजन करून वरोरा जिल्ह्याची निर्मिती करावी. अशी मागणी करण्यात आली. यासोबतच गांधी सागर तलावाचे खोलीकरण करण्याकरिता निधी द्यावा, वरोरा तालुक्यात वनपर्यटनाची परंतु चिमुर वनक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेली वनजमीन वगळता वरोरा तालुक्यात एकूण ८३३४.४९ हेक्टर वनजमिन उपलब्ध आहे. या व्यतीरीक्त महसुल विभागाची जमीन उपलब्ध आहे. यापैकी सुर्ला, सालोरी, मेसा, टेमुर्डा, रामपूर या परिसरात एकूण ३१७९.०२ हेटर जमिन वरोरा परिसरातील वरोरा ते शेगाव, वरोरा ते टेमुर्डा, रामपूर या भागात आहे. याठिकाणी वनपर्यंटनाचे केंद्र उभारल्या शासनाला मोठ्या प्रमाणात राजस्व निर्माण होईल. त्यामुळे वनपर्यंटन केंद्र उभारण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. यावेळी वनमंत्री मुनगंटीवार तलाव खोलीकरणासाठी एक करोड रुपये देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रविण धनवलकर, माजी मंत्री संजय देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबा भागडे, मुख्यधिकारी सुनिल बल्लाळ, तसेच जिल्हा संघर्ष समिती, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती, जागृती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister for the Warora district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.