पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह जिल्हावासियांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By राजेश भोजेकर | Published: April 14, 2023 11:55 AM2023-04-14T11:55:49+5:302023-04-14T11:57:01+5:30

आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष

Guardian Minister Mungantiwar along with Bharat Ratna of the district residents. Salute to Babasaheb Ambedkar | पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह जिल्हावासियांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह जिल्हावासियांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

googlenewsNext

चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह बाबासाहेबांच्या अनुयायांनी तसेच जिल्हावासियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

चंद्रपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची त्यांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. प्रत्येकांनी शिस्तबद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून बौद्ध बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रपूरचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार बंटी भांगडिया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडवाले यांनी आपापल्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Web Title: Guardian Minister Mungantiwar along with Bharat Ratna of the district residents. Salute to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.