दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:18 AM2019-06-06T00:18:45+5:302019-06-06T00:19:22+5:30

चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

Grant in eight days to Dindoda project affected | दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान

googlenewsNext
ठळक मुद्देबाळू धानोरकर : विकास कामांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर मनपाचे नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, सुनिता लोढीया, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, चंद्रपूर मनपा अंतर्गत अमृत कलश पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता त्रास होत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाºयांना दिल्या.
ही योजना २२७ कोटी ९६ लाखांची आहे. जून २०१९ रोजी कराराची मुदत संपत आहे. त्या कंपनीला चार महिने मुदत वाढवून दिली जाणार आहे.
येत्या चार महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची माहिती मनपा अधिकाºयांनी बैठकीत दिली. रेती घाटांच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे.
परिणामी, व्यावसायिकांना रेती मिळणे बंद झाले. रेती घाट पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करणे किंवा लिलावाची रक्कम परत मिळण्याकरिता शासनाकडून मार्गदर्शन मागवून कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी दिली. भद्रावती येथील जिल्हा पर्यटन निधी अंतर्गत पुरातन हनुमान मंदिर संरक्षण भिंतीच्या बांधकाम, भद्रावती झोपडपट्टीधारकांना घरकुलांचा लाभ देण्याकरिता १.६१ हे. आर. जागा न.प. भद्रावतीला हस्तांतरित करणे, आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. चंद्रपूर व आर्णी क्षेत्रातील विविध समस्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
या आढावा बैठकीला विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Grant in eight days to Dindoda project affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.