नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:05 PM2018-11-24T22:05:08+5:302018-11-24T22:05:43+5:30

राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. ...

For the first time the construction of the dam on the river | नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

नदीवर पहिल्यांदाच बंधाऱ्याची निर्मिती

Next
ठळक मुद्दे३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण : अंधारी नदीवर सुरू आहे बांधकाम

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यानंतर ते अडून न राहता इतरत्र वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासते. पावसाचे पाणी अडून राहावे व त्याचा उपयोग शेतीबरोबरच इतरही व्यवसायाला व्हावे, या दृष्टीने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल ताजलुक्यातील चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती होणार आहे. शेतकºयांना वरदान ठरणाऱ्या या बांधाऱ्यामुळे ३.९३ लक्ष घनमीटर पाण्याची साठवण होणार आहे. यापूर्वी सिंचन विभागांतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. या बंधाºयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवरील हा पहिलाच सिमेंट बंधारा असणार आहे.
मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळील सुशी, पोंभूर्णा, चिंतलधाबा पोडसा ते राज्यसीमा (राज्य ३६९) रस्त्यावरील अंधारी नदीवर ९० मीटर लांबीचा उंच पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१५-१६ या वर्षात बांधला. सदर पुलालगत सिमेंट बंधारा बांधण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांवर शेती व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायाला जोड देता येईल, अशी मागणी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची आवश्यकता बघून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसभा खासदार अनु अगा यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ आॅक्टोबर २०१७ च्या आदेशान्वये १११.०५ लक्ष किमतीच्या बांधाऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली. या बंधाºयाची लांबी ९० मीटर असून गेटची उंची ३.५० मीटर आहे. या बंधाऱ्यांमुळै ३.९३ घनमीटर म्हणजे ३९३ टीसीएम पाण्याची साठवण होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नदीवर हा पहिलाच सिमेेंट बंधारा बांधला जात असून भविष्यात नदीवर असल्याप्रकारचे बंधारे बांधून पाण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
बंधारा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरित
सदर बांधकामाला सुरूवात झाली असून एप्रिल २०१९ पर्यंत सदर बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास येणार आहे. ७०.४४ टक्के निधीमध्ये सदर बंधाºयांचे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे २९.५६ टक्के निधीची बचत होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे बंधाऱ्यांची देखभाल व सनियंत्रण संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे. त्यानंतर सदर बंधारा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित केला जाणार आहे

शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणारा अंधारी नदी जवळील सिमेंट बंधाऱ्यांचे काम एप्रिल २०१९ मध्ये पुर्णत्वास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून शेती उद्योगाबरोबरच मासेमारी व्यवसायासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
- रूपेश बोदले, सहा. अभियंता बांधकाम विभाग, मूल

Web Title: For the first time the construction of the dam on the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.