कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:38 AM2019-01-07T00:38:20+5:302019-01-07T00:38:42+5:30

तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे.

Farmers' inconvenience due to the decline in cotton production | कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

Next
ठळक मुद्देआर्थिक बोजा वाढला : शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.
खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यात सात हजार ६७९ हेक्टर कृषी क्षेत्र निर्धारित करण्यात आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी पडणाºया पावसाने खंड पाडल्याने शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तालुक्यातील भात व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सात हजार ५०५.६० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी कापसाची तर दोन हजार ९८६.४० हेक्टर क्षेत्रात भाताचे लागवड केली. मात्र, कापसाने यावर्षी बळीराजाला जबर फटका दिला. गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता बळराजाला सतावत आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी, शेतमजूर यावरच वर्षभराच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतात. परंतु शेती मालाचे उत्पादन घटल्याने बळीराजाचे अवसान गळाले आहे. शेतीची मशागत करूनही उत्पादनात वाढ झाली होत नसल्याने हवालदील झाला आहे. कृषी क्षेत्रातील एकूण पीक पेरणी क्षेत्रापैकी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८८५.५० क्षेत्रात कापूस १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये भाजीपाली, ४९६.८० हेक्टरमध्ये तूर, दोन हजार ९८६.४० हेक्टरमध्ये भात तर केवळ १२८.४० हेक्टर सोयाबिन पिकांची लागवड केली. परंतु पर्जन्यमानाचा खंड पडल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला.
अशातच बोंडअळीच्या आक्रमणाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. उचल केल्याच्या कर्जाची परतफेड कशी करावी. कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्र समोर आला आहे. यातून बळीराजाला सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Farmers' inconvenience due to the decline in cotton production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस