अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षी बिबट्या अडकला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:40 AM2018-12-15T11:40:57+5:302018-12-15T11:41:24+5:30

गेल्या महिनाभरात चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले.

Eventually, in the Chandrapur district, the cannibals of leopard sticks are trapped | अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षी बिबट्या अडकला जाळ्यात

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षी बिबट्या अडकला जाळ्यात

Next
ठळक मुद्देनागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गेल्या महिनाभरात चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले.
या बिबट्याने गेल्या १५ दिवसात सात हल्ले चढविले होते व पाच जणांना ठार केले होते. या परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशतीत होते. त्याच्या दहशतीमुळे बोथली, राळेगाव, निमध्येला, वाहनगाव आदी गावातील नागरिक शेतात जाताना कचरत होते.
या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता. मात्र तो त्यात अडकत नव्हता. शुक्रवार १४ रोजी या परिसरात लावलेल्या एका पिंजऱ्यात मात्र हा बिबट्या अडकला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला योग्य ठिकाणी सोडले जाणार आहे.

Web Title: Eventually, in the Chandrapur district, the cannibals of leopard sticks are trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.