कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीच्या ४४२ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:48 AM2018-06-10T00:48:40+5:302018-06-10T00:48:40+5:30

Due to employees' strike, ST 442 rounds canceled | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीच्या ४४२ फेऱ्या रद्द

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीच्या ४४२ फेऱ्या रद्द

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : १५ लाखांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून अघोषित संप पुकारला आहे. या संपामुळे चंद्रपूर विभागातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा व चिमूर या चार एसटी आगाराच्या तब्बल ४४२ बसफेºया रद्द झाल्या. त्यामुळे परिवहन महामंडळाला जवळपास १५ लाखांचा फटका बसल्याची माहिती चंद्रपूरचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
चंद्रपूर विभाग अंतर्गत वरोरा, राजुरा, चंद्रपूर, चिमूर एसटी आगार असून या चारही आगारातून दररोज ७७१ बसफेऱ्या धावतात. मात्र संपामुळे ४४२ बसफेऱ्या रद्द झाल्या. चंद्रपूर येथील बस आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होती. मात्र ग्रामीण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
शनिवारी संप करणाऱ्या वरोरा आगाराच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. इतरही ठिकाणी संपकरी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई होणार असल्याचे संकेत विभाग नियंत्रक पाटील यांनी दिले आहे.

Web Title: Due to employees' strike, ST 442 rounds canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.