धुळीमुळे जनआरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:42 PM2018-01-19T23:42:44+5:302018-01-19T23:44:09+5:30

भोयगाव ते गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये लाल माती टाकली होती.

Due to dusty health risks | धुळीमुळे जनआरोग्य धोक्यात

धुळीमुळे जनआरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातांच्या संख्येत वाढ

आॅनलाईन लोकमत
बाखर्डी : भोयगाव ते गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये लाल माती टाकली होती. मात्र या मार्गावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धुळ उडून नागरिकांच्या नाकातोंडात जाते. परिणामी अनेकांना श्वसनांचे आजार जडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भोयगाव ते गडचांदूर हा मार्ग जवळ पडतो. कोरपना तालुक्यात चार कंपन्या आहेत. या चारही कंपन्यांचे ओव्हरलोड ट्रक याच मार्गाने मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे हा मार्ग पुर्णपणे उखळला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी लाल माती टाकण्यात आली. मात्र ती माती अस्ताव्यस्त पसरली आहे. परिणामी या मार्गावर अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
लगतच्या शेतातील पांढरा कापूस काळवंडला
चंद्रपूरला जाण्यासाठी अनेकजण भोयगाव ते गडचांदूर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मात्र वाहन गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतात असलेला पांढरा कापूस पूर्णपणे काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शेतकरी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. मात्र शासनाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डांबर टाकण्याऐवजी लाल माती टाकली. मात्र धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर रस्त्याची आठवडाभरात दुरुस्ती करावी, अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
नादुरुस्त रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद
रस्त्याची दुरवस्था बघून एसटी महामंडळाने भोयगाव-गडचांदूर या रस्त्यावरील अनेक बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच प्रवाशांना मोठी अडचण जात आहे. परिणामी प्रवशांना तिप्पट पैसे देऊन खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

Web Title: Due to dusty health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.