मार्गावरील धुळीने पिके काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:06 AM2018-12-07T00:06:54+5:302018-12-07T00:07:31+5:30

उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामूळे शेतातील उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने धुळीने काळवंडत आहे.

Due to the dirt, the crops have not blackened | मार्गावरील धुळीने पिके काळवंडली

मार्गावरील धुळीने पिके काळवंडली

googlenewsNext
ठळक मुद्देढिसाळ नियोजनाचा फटका : शेकडो शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

आशिष गजभिये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामूळे शेतातील उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने धुळीने काळवंडत आहे. यातून मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रं.३५३ (ई) मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याकरिता चिमूर- वरोरा मार्ग संबधित कंपनीने पूर्णत: खोदला आहे. हे काम कासवगतीने सुरु आहे. वाहतुकीकरिता याठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आते. बांधकाम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता संबंधित मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा केला जात आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. मार्गालगत बहुतांश शेतकरी कपाशीचे पीक घेतात. परंतु, धुळीवर पाणी मारल्या जात नाही. ही धुळ पिकांवर बसत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली गावातील शेतकºयांच्या शेताचे कंत्राटदाराच्या चुकीमुळे उभी पिके काळवंडली.
शेतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुळीचे थर बसले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. शिवाय, विविध रोगांच्या प्रादुर्भामुळे कापसाचे उत्पादन अत्यल्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. लागवडीचा खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकरी विचात आहेत.
दुष्काळग्रस्त चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट दिसत आहे. कमी प्रमाणात लागलेली कापसाची बोंडे काळवंडली आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण करताना मार्गावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कापसाची प्रत खराब झाली. कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.
पावसाळ्यादरम्यान महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली येथील शेतकºयांच्या शेतात पाणी शिरले होते. यातही मोठे नुकसान झाले. चौपदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे महामार्गालगतच्या पिकांवर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील वरोरा- चिमूर मार्गावरील विविध गावांच्या शेतकºयांनी केली आहे.
अपघातांचे सत्र सुरूच
मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. पर्यायी मार्गाची डागडुजी होत नसल्याने अपघातांचे प्रणाम वाढले आहे. या मार्गावर गिट्टी व मुरूमाचे ठिकठिकाणी ढिगारे टाकल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली.

Web Title: Due to the dirt, the crops have not blackened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.