चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:17 AM2017-11-25T11:17:34+5:302017-11-25T11:18:00+5:30

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.  

Due to the collapse of coal mine in Chandrapur district, the death of Dodger operator dies | चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू

Next
ठळक मुद्देखाण धोकादायक असल्याचा वेकोलिचा पूर्वीच इशारा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.  
शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासूनच दबलेल्या कामगाराला काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र साठ ते सत्तर मीटर शेकडो टन कोळसा वरून असल्याने शनिवारी सकाळी ७-३० वाजता कामगाराचा मृततदेह काढण्यात आला. तेलवासा खुल्या खाणीत कोळसा फेस वरून ३०० मिटर उंच आहे. याचे बनवलेले बेंच पूर्वीपासूनच धोकादायक होते. त्यामुळे गेल्या वर्षी वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिकाºयांनी खाण बंद करण्याचे आदेश दिले होते. सविस्तर अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Due to the collapse of coal mine in Chandrapur district, the death of Dodger operator dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात