सामूहिक प्रयत्नातूनच गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:11 PM2018-03-24T23:11:35+5:302018-03-24T23:11:35+5:30

अंबुजा सिमेंट उद्योगातील परिसरातील गावांचा विकास करताना अनेक बाबी गावकऱ्यांकडून शिकायला मिळाल्या. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत मराठा सिमेंट वर्क्सचे विलास देशमुख यांनी व्यक्त केले. अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमानिमित्त सत्काराप्रसंगी ते बोलत होते.

Development of villages through mass efforts | सामूहिक प्रयत्नातूनच गावांचा विकास

सामूहिक प्रयत्नातूनच गावांचा विकास

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे गुणवंतांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
कोरपना : अंबुजा सिमेंट उद्योगातील परिसरातील गावांचा विकास करताना अनेक बाबी गावकऱ्यांकडून शिकायला मिळाल्या. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत मराठा सिमेंट वर्क्सचे विलास देशमुख यांनी व्यक्त केले. अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या सिल्वर ज्युबली कार्यक्रमानिमित्त सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. ठाकूर, पर्ल तिवारी, प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार पनेरी, प्रकल्प प्रबंधक रवी नायसे, नाबार्डचे आजीनाथ तेले, विजय अग्रवाल, संजिवा राव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र बन्सोड, सोपान नागरगोजे, प्रमोद खडसे उपस्थित होते. वनसडी येथील संध्या वैद्य, एकता महिला सक्षमीकरण संघाच्या सचिव चंदा रामगिरवार, गडचांदूर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष उद्धव कुळमेथे व कौशल्य उद्योजक संस्थेतील माजी विद्यार्थी मनोज झाडे यांनी कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले. देशमुख म्हणाले, गावकºयांच्या सहकार्याने विकासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तुमचा सर्वांचा स्नेह व सहकार्य मिळाल्यानेच अंबुजा सिमेंट फाऊंडेशनला उद्योगातील परिसरातील गावांना मदत करणे शक्य झाले.
कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत मिशन यावर नाटिका सादर करण्यात आली. जि. प. शाळा पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविक पनेरी, संचालन साक्षी शर्मा व अर्निस सिंग यांनी केले. प्राचार्य प्रमोद खडसे यांनी आभार मानले.

Web Title: Development of villages through mass efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.