‘त्या’ निर्णयांच्या अंमलबजावणीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:12 PM2018-09-24T23:12:34+5:302018-09-24T23:12:47+5:30

मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Delay in the implementation of those 'decisions | ‘त्या’ निर्णयांच्या अंमलबजावणीला विलंब

‘त्या’ निर्णयांच्या अंमलबजावणीला विलंब

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : गडचिरोली व चंद्रपूर वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ कॅबिनेट निर्णय १४४ अन्वये राज्यात कार्यरत ७३८ वैद्यकीय अधिकारी गट-ब यांच्या सेवा नियमित करण्याचा कॅबिनेट निर्णय २९ आॅगस्ट २०१७ रोजी घेण्यात आला होता. याला एक वर्षांच्या कालावधी लोटला असला तरीही त्या निर्णयाचे शासन निर्णयात रूपांतर झाले नाही. त्यामुळे सदर निर्णयाला शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी चंद्रपूर व राज्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्सलगस्त डोंगराळ असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांनी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार याना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल उपस्थित होते. निवेदन देणाºया शिष्टमंडळात डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. विशाल येरावार, अहेरी, डॉ. राजेश मानकर, आलापल्ली, डॉ. भरत काकडे, मुलचेरा, डॉ. अकील कुरेशी, कोरपना, डॉ. सय्यद लगाम आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Delay in the implementation of those 'decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.