वहाणगावच्या उपसरपंचावरील जिल्हाबंदी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:13 AM2017-11-01T01:13:01+5:302017-11-01T01:13:27+5:30

तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला.

De-addiction on the sub-district of Vahanagea | वहाणगावच्या उपसरपंचावरील जिल्हाबंदी हटवा

वहाणगावच्या उपसरपंचावरील जिल्हाबंदी हटवा

Next
ठळक मुद्देदारूबंदी प्रकरण : गावकºयांचे जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला. २३ आॅक्टोबरला ग्रामसभेची अंमलबजावणी करून आंदोलन केले होते. या आंदोलनाने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे दारूबंदी आंदोलनातील प्रमुख वहाणगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे यांना प्रशासनाने जिल्हाबंदी केली व गावातील ७० नागरिकांवर गुन्हे दाखल केले होते.
प्रशासनाने जनतेवर अन्याय केला आहे. प्रशांत कोल्हे यांच्यावरील जिल्हाबंदी हटवा व गावकºयांवर लावलेले गुन्हे रद्द करा, असे निवेदन गावकºयांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना उपविभागीय अधिकाºयांमार्फत पाठविले आहे. अवैध दारूविक्री कंटाळून गावकºयांनी २ सप्टेंबरला ग्रामसभा घेवून अवैद्य दारूविक्री बंद करा अथवा ग्रामपंचायतीला दारू विक्रीची परवानगी द्या, असा ठराव पारीत करण्यात आला होता.
ग्रामसभेची अंमलबजावणी म्हणून २३ आॅक्टोबरला शासनाला जाग आणण्याच्या दृष्टीकोनातून गावात देशी-विदेशी दारूचा फलक लावून नागरिकांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान व्हिडीओ चित्रीकरणात असणाºया ७० महिला, पुरूषांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे. प्रशासनाने गावकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून उलट उपसरपंच प्रशांत कोल्हे यांच्यावर जिल्हाबंदी करून गावकºयांवर गुन्हा नोंद केला आहे. कोल्हे यांच्यावरील जिल्हाबंदी हटवावी व दारूबंदी गावकºयांवर दाखल केलेले गुन्हे ८ दिवसात रद्द करण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. शिष्टमंडळात बंडू भोयर, गजानन कोल्हे, बबन जांभुळे, चंद्रभान खोंड, अरविंद थुटे, गजानन गायकवाड, सुधाकर दडमल, विलास गोठे, शंकर नन्नावरे आदी गावकरी उपस्थित होते.
ग्रामसभा ठरावाचा कायदा प्रशासनाने मोडला
ग्रामसभा ही सार्वभौम ग्राम असून घटना क्रमांक ७३ नुसार कायदा २४३ (ब) नुसार सत्ता लोकांच्या हातात असते. मात्र प्रशासनाने ग्रामसभेच्या ठरावाचा कायदा मोडून ग्रामसभेचे निरपराध अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्यावर जिल्हाबंदी व गावकºयांवर गुन्हे नोंदवून गावकºयांवर अन्याय केला आहे.

Web Title: De-addiction on the sub-district of Vahanagea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.