पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांचा बंद

By admin | Published: February 11, 2016 01:21 AM2016-02-11T01:21:48+5:302016-02-11T01:21:48+5:30

सरकारने दोन लाखांवर दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या सक्तीच्या विरोधात चंद्रपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी बुधवारी...

Closure of bullion professionals against PAN card compulsions | पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांचा बंद

पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांचा बंद

Next

सक्ती रद्द करण्याची मागणी : शासनाचे वेधले लक्ष
चंद्रपूर : सरकारने दोन लाखांवर दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या सक्तीच्या विरोधात चंद्रपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी बुधवारी १०० टक्के बंद पाळला व पॅनकॉर्डची सक्ती रद्द करण्याची मागणी केली.
सरकाने दोन लाखांच्यावर दागिने खरेदी-विक्री केल्यास पॅनकॉर्ड आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पॅनकॉर्डची झेरॉक्स प्रत घेऊन सरकारला माहिती द्यायची आहे. सराफा व्यापाऱ्यांनी या सक्तीचा विरोध करीत गांधी चौक, तुकूम, हॉस्पिटल वार्ड, कस्तुरबा मार्गावरील प्रसिद्ध ज्वेलर्सची दुकाने बंद ठेवली.
गांधी चौकात दागिन्यांचे डझनभर दुकाने आहेत. त्यामुळे येथे दररोज मोठी गर्दी राहत असते. मात्र बंदमुळे येथे सुमसान दिसून आले. चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी यांनी सरकार ग्राहक व व्यापाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे म्हटले असून आॅल इंडिया जेन्स ज्वेलरी असोसिएशनने १० लाख रुपयांच्यावर खरेदीवर पॅन कॉर्डची अट घालण्याचे म्हटले आहे. ही अट मान्य न केल्यास अनिश्चीत काळासाठी दुकाणे बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला असून याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Closure of bullion professionals against PAN card compulsions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.