पिकांचे संरक्षण करते घंटा!, चंद्रपुरातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:16 AM2018-06-29T06:16:58+5:302018-06-29T06:17:01+5:30

वन्यजिवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी येथील एका तरुण शेतक-याने अफलातून शक्कल लढविली आहे

Brent !, the unique experiment of farmers in Chandrapur, protects crops | पिकांचे संरक्षण करते घंटा!, चंद्रपुरातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

पिकांचे संरक्षण करते घंटा!, चंद्रपुरातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

चंद्रपूर : वन्यजिवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी येथील एका तरुण शेतक-याने अफलातून शक्कल लढविली आहे. स्वयंचलित घंटा तयार करून त्याने शेतात लावली असून या उपकरणाचे त्याने ‘शेतरक्षक’ असे नामकरणही केले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटरप्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.
सुहास पिंगे असे या तरुणाचे नाव असून त्याने आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. वरोरा तालुक्यातील गौळ येथे त्यांची १२ एकर शेती आहे. शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे आदी वन्यजीवांमुळे पिकांची प्रचंड नासाडी होत होती. पिकांच्या संरक्षणासाठी रात्री माणसे ठेवावी लागत होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. अखेर पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी पिंगे यांनी स्वत:च शक्कल चालविली आणि विजेवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली.
हे उपकरण तयार करणयासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य उपयोगात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. दर पाच मिनिटांनी ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजतअसल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात.
ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे सुहास पिंगे यांनी सांगितले.

Web Title: Brent !, the unique experiment of farmers in Chandrapur, protects crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.