बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:51 PM2017-09-23T23:51:59+5:302017-09-23T23:52:13+5:30

मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही.

Borghat Upasana sprouted the farmer's irrigation water | बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो

बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो

Next
ठळक मुद्देसिंचन विभागाला निवेदन : बोंडाळा बुज. येथील शेतकºयांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा बुज : मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यांना सिंचन सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. शेतकरी जिवाचा आकांताने टाहो फोडत असले तरी संबंधित विभाग मात्र मूग गिळून बसला आहे.
बोंडाळा बुज येथील विद्यमान सरपंच योगेश शेरकी यांच्या नेतृत्वात शेतकºयांसह नुकतेच शाखा अभियंता सिंचन विभाग शाखा नांदगाव (बेंबाळ) यांना निवेदन सादर करून पाणी टंचाईची समस्या मांडण्यात आली.
यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मु. आ. कांजणे, पाटबंधारे उपविभाग सावलीचे उपविभागीय अभियंता र. सु. रणदिवे, कालवा निरीक्षक पी.डी. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. बोंडाळा बुज या गावातील ३०० हेक्टर शेती पिकाच्या लागवडीखाली येत असून शेतीमध्ये धान व कापूस हे पीक उभे आहे. परंतु शेतात उभे पीक असताना शेतीसाठी मात्र पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उभे पीक जलसंकटात कोसळेल काय, अशी भीती शेतकºयांमध्ये वर्तविली जात आहे. सिंचनाची सोय नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याच्या उपाययोजनेसाठी गावालगत पाटाचे खोदकाम करण्यात आले होते. परंतु पाणी पुरत नसल्याचे कारण समोर ढकलून सदर गावाला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. खोदकाम करून केवळ देखावा निर्माण केला काय, असा सवालही शेतकºयांकडून विचारला जात आहे.
सिंचन उपाययोजनेचे पाणी शेतीला मिळत नसल्याने शेतकºयांची पिके करपली जावून नापिकीची परिस्थिती ओढवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सध्या चिंताग्रस्त झाला आहे.

बोरघाट उपसा जलसिंचन योजना यावर्षी सन २०१७-१८ मध्ये सुरू झाली असून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. सद्यस्थितीत तीनपैकी एक पंप सुरू आहे. आजतागायत पाण्याचे नियोजन करून उर्वरित गावांना पाणी पोहचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत.
- मु.आ. कांजुणे, शाखा अभियंता, सिंचन शाखा बेंबाळ, नांदगाव

Web Title: Borghat Upasana sprouted the farmer's irrigation water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.