प्रस्थापित राजकीय पक्षाकडून वंचितांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:02 PM2019-01-22T23:02:24+5:302019-01-22T23:02:45+5:30

प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केले. वंचित बहुजन आघाडीतर्फे नगीनाबाग स्वावलंबी पटांगणावर जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अ‍ॅड. विजय मोरे, अमित भुईगड, रामराम चव्हाण, धिरज बांबोळे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

The betrayal of the established political party | प्रस्थापित राजकीय पक्षाकडून वंचितांची फसवणूक

प्रस्थापित राजकीय पक्षाकडून वंचितांची फसवणूक

Next
ठळक मुद्देबाळासाहेब आंबेडकर : बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केले. वंचित बहुजन आघाडीतर्फे नगीनाबाग स्वावलंबी पटांगणावर जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अ‍ॅड. विजय मोरे, अमित भुईगड, रामराम चव्हाण, धिरज बांबोळे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, लोकशाही राज्यव्यवस्थेत वंचितांच्या न्याय हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी महाराष्टÑामध्ये वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली. ही आघाडी राजकीय अस्मितेसाठी नव्हे, तर त्यांच्या हक्कांसाठी आहे. प्रस्तापित राजकीय पक्षांनी या आघाडीचा धसका घेतला आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

नोटबंदीचा निर्णय आत्मघातकी - आंबेडकर
भाजपाने चुकीची धोरणे राबविल्याने वंचितांचे न्याय हक्क धोक्यात आले. नोटबंदीचा आत्मघाती निर्णय घेवून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी केली. आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याने भाजपा सरकार धार्मिक दुहीचे राजकारण करत असल्याची टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली. जाहिर सभेसाठी एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी येणार असल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, ते न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
 

Web Title: The betrayal of the established political party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.