चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:38 AM2017-07-23T00:38:41+5:302017-07-23T00:38:41+5:30

महाराष्ट्र पंचायत परिषदेच्या वतीने चीनच्या उत्पादीत मालावर जाहीर बहिष्कार टाकून चीनच्या उत्पादनास किमान चंद्रपूर जिल्ह्यात बंदीचे आदेश द्यावे,

Appeal to District Collector to boycott China's production | चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

पंचायत परिषदेची मागणी : दिवाळी व दसऱ्यापूर्वी बंदी घालावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महाराष्ट्र पंचायत परिषदेच्या वतीने चीनच्या उत्पादीत मालावर जाहीर बहिष्कार टाकून चीनच्या उत्पादनास किमान चंद्रपूर जिल्ह्यात बंदीचे आदेश द्यावे, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
भारत-चीन सीमेवरील तणाव जाणूनबुजून निर्माण करणाऱ्या चीनच्या लष्काराने भारत-भुतान-तिबेट या तीन देशाच्या सीमेवरील डोकलाग भागात जबरदस्तीने रस्ते बांधणीचे काम सुरू केले होते. मात्र भारताच्या लष्कराने हे काम त्वरीत थांबविले आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे चीनच्या या जबरदस्त दहशतवादी धोरणामुळे परत काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना अधिक बळ मिळत आहे. त्यामुळे चिनच्या कुरापती बंद व्हाव्यात म्हणून भारत सरकारने बंद केल्या पहिजेत. तसेच महाराष्ट्र शासनानेसुध्दा अधिक कडक धोरण अबलंबून किमान महाराष्ट्रातील नागरिकांनी चीनच्या कोणत्याही वस्तू खरेदी न करता जनतेने त्यावर बहिष्कार टाकावा, असे धोरण राबविण्यात यावे. सीमा प्रश्नांना कायम अडचणीत आणण्याचे काम चीन सरकारने सुरू केलेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी येत्या दिवाळी, दसरा व हिेंदू संस्कृतीमध्ये येणाऱ्या कोणत्याही उत्सवानिमित्त चीनने उत्पादीत केलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी न करता त्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा. त्याकरिता राज्यशासनानेसुध्दा लवचिकतेचे धोरण न स्वीकारता कडक धोरण स्वीकारून किमान महाराष्ट्रातील बाजारपेट्टेवर चीनच्या वस्तू नागरिकांनी खरेदी करून नये, असे आदेश राज्य शासनाने काढावेत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना शिष्टमंडळात महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया, सुनील काळे, प्रतिक भगत, ईसाभाई आदींची उपस्थिती होती.

Web Title: Appeal to District Collector to boycott China's production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.