तब्बल १२ तासांनी येतील निकाल हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:06 PM2019-05-21T23:06:31+5:302019-05-21T23:06:59+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात होणार असली तरी सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. निकालासाठी कमीत कमी १२ तासांची वाट पहावी लागणार आहे, असे संकेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

After 12 hours, the results will come out | तब्बल १२ तासांनी येतील निकाल हाती

तब्बल १२ तासांनी येतील निकाल हाती

googlenewsNext
ठळक मुद्देकुणाल खेमनार : लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरूवात होणार असली तरी सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. निकालासाठी कमीत कमी १२ तासांची वाट पहावी लागणार आहे, असे संकेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिली. या मतमोजणीसाठी सहाही विधानसभानिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून ३२८ अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावणार आहेत. २५ ते ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. एक फेरी ३० ते ४० मिनिटांची असेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
११ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाच्या दिर्घ कालावधीनंतर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन चंद्रपूरजवळच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सिलबंद ठेवल्या असून २३ मे रोजी सकाळी ७ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गोदाम उघडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये १४ टेबल राहणार आहे. याकरिता ३२८ कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या सुक्ष्म निरीक्षणासाठी, मतमोजणी प्रक्रियेची अचुकता तपासण्यासाठी व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉलकरिता अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक देण्यात येणार आहे. तसेच निकाल अचुक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचुक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांसोबत तपासून समिक्षा करून घेतील. जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. खेमनार यांनी दिली. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपरपासून मोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया मोजल्या जाणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठयांची मोजणी प्रत्येक मतदार संघातील प्रातिनिधीक निवड पध्दतीने केली जाणार आहे.

नागरिकांसाठी १०० मीटर अंतरावर व्यवस्था
नागरिकांसाठी २३ तारखेला मतमोजणी परिसरात शंभर मीटर अंतरावर जिल्हा प्रशासनाने थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी लाऊडस्पिकरवर माहिती मिळणार आहे. शंभर मीटरच्या आतमध्ये कोणत्याही वाहनाला व नागरिकांना प्रवेश नाही. मतमोजणी कर्मचारी, जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रवेशिका असणारे कर्मचारी, अनुषंगिक कामगार, निवडणूक आयोगाचे विशेष प्रवेश पत्र असणारे पत्रकार यांनाच फक्त प्रवेश आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण निवडणूक आयोगामार्फत करण्यात येणार आहे. यावेळेस प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन व त्यातील चिठ्ठयांची मोजणीदेखील होणार असल्यामुळे दरवेळीपेक्षा निकालाला अधिक वेळ लागू शकतो, अशी शक्यता जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी व्यक्त केली आहे.
३२८ कर्मचारी कामाला
मतमोजणी ही प्रक्रिया अतिशय कडक बंदोबस्तात वखार महामंडळातच सुरु होणार असून या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे या स्थळाची सुरक्षा व्यवस्था असून या ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश निषिध्द आहे. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी सहायक, मतमोजणी पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक अशा ३२८ कर्मचाºयांचा सहभाग आहे. परिसरात पाचशे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
निरीक्षकांनी केली पाहणी
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नेमणूक केली आहे. चंद्रपूरमध्ये दिपांकर सिन्हा व जे.पी.पाठक हे वरिष्ठ सनदी अधिकारी निरीक्षक म्हणून दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या बंद गोदामाची त्याच पुढे गोदामामध्ये निर्माण करण्यात आलेली मतमोजणी यंत्रणेची निरीक्षकांनी आज पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यावेळी त्यांच्यासोबत होते.

Web Title: After 12 hours, the results will come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.