९५ लाख रोपांनी बहरल्या ४३ रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:55 AM2018-06-13T00:55:26+5:302018-06-13T00:55:26+5:30

जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे.

43 nursery nurseries spread around 55 lakh plants | ९५ लाख रोपांनी बहरल्या ४३ रोपवाटिका

९५ लाख रोपांनी बहरल्या ४३ रोपवाटिका

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या निर्देशाची फ लश्रुती : चंद्रपूर जिल्ह्यात ७९ लाख वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ४३ रोपवाटिकांमुळे विविध प्रकारची तब्बल ९५ लाख ५१ हजार ४४ रोपे जोमाने बहरली असून जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी या रोपांचा वापर केला जाणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार नियोजन केल्याने वन विभागाला यावेळी मोठे यश आले. विशेष म्हणजे यंदाच्या मोहिमेसाठी रोपांची टंचाई भासणार नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून दिसून आले.
यंदा शासनाने जिल्ह्याला ७७ लाख २४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले. मात्र वन विभागाने आणि सर्व शासकीय यंत्रणांनी ७९ लाख पाच हजार रोपे लागवडीचे नियोजन केले आहे. ग्लोबल वार्निंगमुळे हवामानात प्रचंड बदल होत आहे. या बदलांमुळे मानवी जीवनावर अनिष्ठ परिणाम झाला. पर्यावरण संतुलनासाठी शासनाचे विविध विभाग व लोकसहभागातून १ जुलै २०१६ ला दोन कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केले. तर २०१७ मध्ये पाच कोटी २७ लाख वृक्षांची लागवड झाली. १ ते २१ जुलै २०१८ दरम्यान वनविभाग, सामाजिक वणीकरण, वनविकास महामंडळ, निमशासकीय संस्था, स्वयंसेवी, सहकारी संस्था, शाळा व महाविद्यालयांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी झाली.
यंदा जुलैमध्ये जिल्ह्यासाठी ७७ लाख २४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी वनविभागाने ७९ लाख ५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले. ही मोहीम हमखास यशस्वी होईल, असा दावा विभागीय वनाधिकारी तथा समन्वयक अशोक सोनकुसरे यांनी केला आहे.
वृक्ष लागवडीचे विभागीय उद्दिष्ट
आगामी जुलै महिन्यात लावण्यात येणाºया वृक्ष लागवडीसाठी वनविभागाने सूक्ष्म नियोजन केले. त्यानुसार विभागनिहाय उद्दिष्ट देण्यात आले. चंद्रपूर वन विभाग, ब्रह्मपुरी, मध्य चांदा वनविभागाकरिता ३१ लाख १० हजार, सामाजिक वनीकरण ३ लाख ८४ हजार, वनविकास महामंडळ १४ लाख ९८ हजार, वन्यजीव विभाग ४ लाख ७३ हजार, इतर यंत्रणा १२ लाख २७ हजार आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ९ लाख ८४ हजार व खासगी उद्योगांना २ लाख २९ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Web Title: 43 nursery nurseries spread around 55 lakh plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.