...अन् तरुणीला आरशात दिसला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 07:17 PM2021-12-21T19:17:50+5:302021-12-21T19:21:28+5:30

The young woman saw a tiger in the mirror : तिला आरशात वाघ दिसल्याने तिने अंगणात येऊन बघितले असता तिला वाघ दिसला

... The young woman saw a tiger in the mirror | ...अन् तरुणीला आरशात दिसला वाघ

...अन् तरुणीला आरशात दिसला वाघ

Next
ठळक मुद्देगोंधनापूरवासी भयभीत वाघ असल्याची चर्चा

खामगाव : गोंधनापूर येथे एक तरुणी आरशात पाहत असताना तिला दरवाजातून वाघ जात असल्याचे निदर्शनास पडले. तिने बाहेर जाऊन पाहिले असता तिला साक्षात वाघ दिसला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने घरात येऊन कुटुंबीयांना माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने तो वाघ नसून बिबट असल्याचे स्पष्ट केले.

खागावातील वाघ असल्याची चर्चा थांबत नाही तोच गोंधनापूर गावातील नागरिकांना बिबट दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील गोंधनापूर गावातील रहिवाशांना १९ डिसेंबर रोजी बिबट दिसल्याची चर्चा सर्वत्र झाल्याने आजूबाजूच्या ४ गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क राहण्याचे जाहीर केले आहे. खामगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघ दिसल्यानंतर संपूर्ण शहरात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अमरावती व बुलडाणाव्यतिरिक्त वन विभागाला पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही वाघाचा शोध लागला नाही. पोलिसांच्या उपस्थितीत वन विभागाने परिसरात वाघाचा शोध घेतला. मात्र, यश मिळू शकले नाही.

९ डिसेंबर रोजी सकाळी अंतरज फाटा संकुलातील जलकाटेलीच्या कच्च्या रस्त्यावरून शेतात बैलगाडीत कामाला जात असलेल्य शेतकऱ्याला वाघ दिसला. मात्र, वाघ दिसल्यानंतरही वन विभागाला वाघाचा सुगावा लागू शकला नाही. त्यानंतर गोंधनापूर येथील रहिवासी मोहम्मद इकबाल यांची मुलगी जरखा तबस्सुम ही घरात आरशासमोर उभी होती. तिला आरशात वाघ दिसल्याने तिने अंगणात येऊन बघितले असता तिला वाघ दिसला. तिला पाहून वाघाने डरकाळी फोडल्यानंतर ती घाबरली आणि घरी परतली.  त्यानंतर तिचे वडील मोहम्मद इकबाल यांनी वाघाची माहिती वरिष्ठ अधिकारी व तहसीलदारांना दिली. घटनेची माहिती मिळताच रात्री वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. गोंधनापूरमध्ये नागरिकांना दिसलेला बिबट असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

गोंधनापूरमध्ये नागरिकांना बिबट दिसला आहे. गोंधनापुरात दिसलेला वाघ नसून बिबट आहे. खामगावमध्ये दिसलेला वाघ सध्या खामगाव शहराबाहेर आहे. सध्या नेमका वाघ कुठे आहे, याबाबत माहिती नाही.

- किशोर पडोळ

वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव

Web Title: ... The young woman saw a tiger in the mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.