मांडवा येथे रंगली कुस्त्यांची दंगल; एक लाख रूपयांची बक्षीसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:58 PM2018-03-30T13:58:39+5:302018-03-30T13:58:39+5:30

बिबी (जि. बुलडाणा) : मांडवा येथे आमलीबारस उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारला कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली होती.

wrestling compitation at mandwa village | मांडवा येथे रंगली कुस्त्यांची दंगल; एक लाख रूपयांची बक्षीसे

मांडवा येथे रंगली कुस्त्यांची दंगल; एक लाख रूपयांची बक्षीसे

Next
ठळक मुद्दे परंपरागत कलश स्थापन करून गळती बसविल्यानंतर गळती उठण्याचा आमलीबारस उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो. बिबी जवळील मांडवा या गावी हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. गावांमध्ये कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

बिबी (जि. बुलडाणा) : मांडवा येथे आमलीबारस उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारला कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली होती. मराठी चैत्र शुध्द मराठी नुतन वर्षानिमित्त गुडी पाडव्याच्या दिवशी विधीवत परंपरागत कलश स्थापन करून गळती बसविल्यानंतर गळती उठण्याचा आमलीबारस उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच प्रमाणे बिबी जवळील मांडवा या गावी हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. गावांमध्ये कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्तीच्या स्पर्धेत अनेक ठिकाणाहून कसलेले मल्ल सहभागी झाले होते. त्यांच्या कुस्तीच्या दंगलीचे गावकºयांचे लक्ष वेधले होते. सकाळी आमली रसाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. सायंकाळी हिंदूच्या विविध देवदेवतांच्या सोंगांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला गावातील सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी सहभाग नोंदवून गावातील एकतेचे दर्शन घडविले. कुस्त्यांसाठी जवळपास एक लाख रूपयांची बक्षीसे वाटण्यात आली. कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Web Title: wrestling compitation at mandwa village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.