वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:37 PM2018-01-31T19:37:26+5:302018-01-31T19:52:20+5:30

मानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणाºया २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली. 

Washim : Manora taluka action against 21 person under police protection! | वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई!

वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई!

googlenewsNext
ठळक मुद्दे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय मानोरा तालुक्यात धडक मोहिम

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणा-या २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली. 
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, गटविकास अधिकारी सुरज गोहाड व पोलिस उपनिरीक्षक विश्वास वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पोलिस विभागाच्या कर्मचारी पथकाने आज तालुक्यातील ग्राम आसोला खुर्द, सोमेश्वर नगर, पोहरादेवी, वाईगौळ व माहुली येथे पहाटे पाच वाजतापासून तळ ठोकला. यादरम्यान उघड्यावर शौचास जात असताना २१ जण आढळून आले. संबंधितांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १५, १६, १७ अन्वये गुन्हा नोंदवून दंड वसूल करयात आला. 
संपूर्ण वाशिम जिल्हा  येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असून अद्याप जिल्ह्यात १० हजार शौचालयांचे बांधकाम होणे बाकी आहे. मानोराला लागुन असलेले कारंजा आणि मंगरुळपीर ही दोन्ही तालुके आजमितीस हगणदरीमुक्त झाली आहेत. त्या धर्तीवर मानोरा तालुकाही हगणदरीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौचास जाणाºयांवर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी इस्कापे यांनी सांगितले. 
मेगा गुडमॉर्निंग पथकात जिल्हा स्वच्छता कक्षाचे आंबेकर,  दुधाटे,   घुले, मानोरा पंचायत समितीचे मिनी बिडीओ सतीश नायसे, संजय भगत, वाघमारे, व्यवहारे, बेलखेडकर, देवेंद्र इंगोले, गजेंद्र चिंतावार, आखाडे, बोंडे, सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश होता.
 

Web Title: Washim : Manora taluka action against 21 person under police protection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम