आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतला बळी; मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:12 AM2018-01-11T00:12:00+5:302018-01-11T00:12:29+5:30

दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Tribal project office took the victim; The accusation of the dead teacher's family | आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतला बळी; मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप

आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतला बळी; मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करून १८ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याबाबत मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदर शाळेवरील २५ शालेय कर्मचार्‍यांपैकी नऊ जणांवर फौजदारी कारवाई होऊन त्यांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच उर्वरित १६ शालेय कर्मचार्‍यांचे इतरत्र समायोजनाचे आदेश असतानाही याबाबत अद्यापही कारवाई  झालेली नाही, तसेच सदर कर्मचार्‍यांना शासन निर्णयानुसार निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अशातच मृत शेख सलीम यांचा आरोपींमध्ये समावेश नसतानासुद्धा व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नसताना त्यांना ४ नोव्हेंबर २0११ रोजी अदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास आयुक्त नाशिक हे शाळेला भेट देण्यास आले असता, शे.सलीम यांच्यावर शाळेत अनुपस्थित राहून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यासह दोन शिक्षक व एक स्वयंपाकी यांना निलंबित करण्यात आले. वस्तुत: भेटीच्या दिवशी शे.सलीम तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात असल्याबाबतचा पुरावा सादर करूनही अन्यायकारक पद्धतीने निलंबित करण्यासोबतच निलंबनानंतर कोणत्याही प्रकारची चौकशीसुद्धा केलेली नाही, तसेच निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील सुरू केलेला नाही. दरम्यान, मृत शे.सलीम यांनी मृत्यूपूर्वी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असता, याकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय निलंबन काळात प्रकल्प कार्यालय अकोला येथे मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीत व या प्रकरणात काही संबंध नसताना सोसावा लागणारा मन:स्ताप सहन न झाल्याने ७ डिसेंबर २0१७ रोजी त्यांच्या राहते गावी सवणा येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन मुले व पत्नी असा परिवार असून, या घटनेनंतर मृताची पत्नी शाहीन परवीन व कुटुंबीयांनी याबाबत दाद मागण्यासाठी अकोला येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेले असता, हा प्रकार अंगलट येण्याच्या भीतीने सदर कार्यालयाने आमच्यावरच खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दोष नसताना मृत्यू पावलेल्या शे.सलीम यांना व इतर तीन कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कयुम शहा व मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

Web Title: Tribal project office took the victim; The accusation of the dead teacher's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.