अपु-या पावसाअभावी सिंचन प्रकल्प तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:37 AM2017-07-27T01:37:16+5:302017-07-27T01:37:25+5:30

धाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.

Thirsty irrigation project due to untimely rains! | अपु-या पावसाअभावी सिंचन प्रकल्प तहानलेले!

अपु-या पावसाअभावी सिंचन प्रकल्प तहानलेले!

Next
ठळक मुद्देखरिपाच्या पिकांवर संकट : शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत.
सतत अवर्षणग्रस्त वातावरण, पिकांचे वारंवार पावसाअभवी होणारे हाल आणि कमी होणारे पर्जन्यमान, यामुळे पीक पेरणी क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होत आहे. सध्या बुलडाणा तालुक्यातील पेरणी क्षेत्रापैकी सोयाबीन पिकास फुले लागली असून, काही ठिकाणी सोयाबीनला वाद्या लागल्या आहे, तर गेल्या सप्ताहभरापासून पावसाचा थेंबही पडला नसल्याने फुले व वाद्याची गळती निश्चित होऊन सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन पीक फळधारणेकडे जात असताना पावसाची उघडीप जीवघेणी ठरत आहे. सोबतच कमी प्रमाणात असणाºया पावसाच्या प्रमाणामुळे खरिपाची सर्वच पिके धोक्यात सापडली आहेत. उघडीपने वरचेवर पिकांना पाण्याची मोठी गरज भासत आहे. पावसाचे पाण्यावर तग धरणारी पिकं विहिरीच्या पाण्यावर दम मारण्यास असमर्थ ठरत आहेत.
५५ हजारांवर असणाºया पेरणीक्षम क्षेत्रावर मका, कपाशीचे क्षेत्र वाढले आहे, तर सोयाबीन त्याचे खालोखाल आहे. नगदी पीक असणाºया पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागत आहे. मागील वर्षी आतापर्यंत किमान तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा जलसाठा आला होता, तर किमान पिकांना पाण्याची ओढ सहन करावी लागली नव्हती. सध्या वातावरण जरी ढगाळ असले, तरी वाºयासोबत वाहून जाणारे ढग कोरडेच ठरत आहे. विचित्र वातावरणाचा आभास हा दुष्काळाकडे वाटचाल करणारा ठरतो की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. शेतकºयांचे माथी सदैव नैसर्गिक संकटाची मालिका असल्याने तो याच्याशी अनेक वर्षांपासून लढा देत आहे; परंतु शासनाने कर्जमाफी घोषित करून अद्यापपर्यंत अंमलबजावणी न केल्याने हे सुलतानी संकट त्यांच्यावर आल्याने यामधून कसे सावरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.

Web Title: Thirsty irrigation project due to untimely rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.