जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:31 AM2017-10-17T00:31:02+5:302017-10-17T00:31:40+5:30

राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे.

There will be 195 villages in the district. | जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

Next
ठळक मुद्देशिवार झाले पाणीदारसिंचन होईल जोमदार!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे. आता  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे. 
 बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले  आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३0 गावे पहिल्या ट प्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये  जलसंधारणाची विविध प्रकारची ९ हजार १३२ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमा तून जिल्ह्यात ४५ हजार २७0 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला  आहे, तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षम ता निर्माण झाली आहे, तर २0 हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन  वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन  २0१६-१७ मध्ये  दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी  काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची  कामे होऊ शकतात, याबाबत निश्‍चितता करण्यात आली आहे.  दुसर्‍या टप्प्यातील २४५ गावांमध्ये ३ हजार २९६ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत, तर ८८ कामे प्रगतीपथावर आहे. या ट प्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार  १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे, तसेच ७ हजार  २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर  क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.  त्याचप्रमाणे  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  या  गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. पहिल्या  टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८0 गावे यामध्ये  प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे  भूजलच्या कमतरतेमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला  आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८0 गावांमध्ये  पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे.  सतत बाहेरून  पाणी आणून या गावकर्‍यांची तहान भागविल्या जात आहे.  या  गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात  भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार  अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी  निश्‍चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे  जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला  खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा  आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. 
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे  पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या  विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे.  या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत  महत्त्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालु क्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गावशिवारात पाणीसाठा  जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शे तकरी सिंचन करून पिके घेत आहेत.

Web Title: There will be 195 villages in the district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस