ठळक मुद्देट्रान्सफार्मर बदलून देण्याची मागणी

बुलडाणा : शेतकºयांच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले असून, शेतकºयांना शेतीला
पाणी देण्यासाठी विद्युतची आवश्यकता असून सुद्धा त्यांच्या शेतातील
ट्रान्सफार्मर जळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शेतकºयांन वेठीस धरुन
ट्रान्सफार्फर देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. म्हणून शेतकºयांच्या
हितासाठी १० नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ
प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम
यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकºयांना ट्रान्सफार्मर तात्काळ देवून त्यांच्या पेरणीसाठी लागणाºया
पाण्याचा प्रशत्न सोडवावा व जळालेल्या अवस्थेतील ट्रान्सफार्मर बदलून
शेतकºयांना लवकरातलवकर द्यावा. जर महावितरणाने शेतकºयांना ट्रान्सफार्मर
देण्यासाठी टाळाटाळ जर केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरणच्या
कार्यालयाला कुलूप ठोकेल, असा इशारा संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात
आला. यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, मीश्कीन
शहा, सैय्यद  जैरुद्दीन, आरीप शहा फरीद शहा, दिलीप वाघमारे, तुळशिदास
इंगळे, बबन शिराळे, अमोल खंडारे, नंदु नवले, अरुण कुळकर्णी, मिलींद
कुळकर्णी, उद्धव इंगळे, मोशीन शेख, दिपक सावजी, तेजराव जाधव यांच्यासह
बरेच कार्यकर्ते उपस्थि होते. (प्रतिनिधी)