Suicide causes suicide | आजाराला कंटाळून शेतमजुराने केली आत्महत्या

ठळक मुद्देघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील गारडगाव येथील ४0 वर्षीय  शेतमजुराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गारडगाव येथील विलास राजाराम खेडकर (४0) यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती. पायाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. विलास खेडकर हे मजुरी करायचे, तर वडिलांचा व्यवसाय शेती होता. त्यांच्या पश्‍चात पत्नीसह आई, बाबा व तीन भाऊ असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.