विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:57 AM2017-10-16T00:57:48+5:302017-10-16T00:58:06+5:30

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी  दिवाळीला फटाके न  फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा  संकल्प केला.

Student's pollution-free Diwali resolution | विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

Next
ठळक मुद्देडोणगाव येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळाप्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली श पथ

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी  दिवाळीला फटाके न  फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा  संकल्प केला.
दिवाळीदरम्यान फटाक्यांसाठी घरून मिळणारे पैसे बचत करून  दिवाळीनंतर गरीब व गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व  शालेय साहित्य देण्याचा निर्धारही विठ्ठल रुखमाई प्राथमिक व  माध्यमिक शाळेच्या ४00 विद्यार्थ्यांनी यावेळी केला. यंदा सर्व  विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रदूषण पसरविणारे फटाके फोडू नये व  सदर पैशांचा सदुपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन मु ख्याध्यापक आत्माराम दांदडे, हेमंत जोशी यांनी शिक्षक व  विद्यार्थी यांना केले. यावर शाळेच्या दिवाळी सुटीच्या शेवटच्या  दिवशी या शाळेचे शिक्षक संजीव भारते, बंडू पांडव, गजानन  भगत, अभिजित दिनोरे, गौतम सदावर्ते, श्याम पांडव व  माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रदूषणमुक्त  दिवाळी आम्ही साजरी करू म्हणून शपथ घेतली. तसेच  वाचलेल्या पैशांतून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय  साहित्य देण्याचा निर्धार केला.

Web Title: Student's pollution-free Diwali resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा