खामगावात 20 जानेवारीला राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 02:07 PM2019-01-13T14:07:58+5:302019-01-13T14:08:28+5:30

खामगाव : सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे.

State level youth Marathi Sahitya Sammelan on January 20 in Khamgaon | खामगावात 20 जानेवारीला राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन

खामगावात 20 जानेवारीला राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन

Next

खामगाव : सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा कादंबरीकार नवनाथ गोरे हे उपस्थित राहणार असून, साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध युवा अभिनेता,लेखक, वक्ते राजकुमार तांगडे
 (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला फेम )यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला   विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा ) मुंबई मा. श्री कृष्णप्रकाश व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक मुंबई,  डॉ.बी जी शेखर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ. अॅड. आकाश फुंडकर ( आमदार खामगाव ) व खामगावच्या नगराध्यक्षा  अनिताताई वैभव डवरे उपस्थित राहणार आहेत. या  उद्घाटन समारंभाला  बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील  अकोला येथून  प्रा.डॉ.संतोष हुशे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे,  प्रा. गजानन भारसाकळे, सुप्रसिद्ध हास्यकवि *अॅड अनंत खेळकर,  ज्येष्ठ पत्रकार राजीव पिसे  प्रा वंदना दीपक मोरे  व प्रशांत सावलकर  यांची उपस्थिती राहणार आहे. खामगाव येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेचे अध्यक्ष संतोष इंगळे, संयोजक अरविंद शिंगाडे  यांनी ही माहिती दिली.
          उद्घाटन समारंभात  संमेलनाच्या निमित्ताने शब्दसृष्टी  या स्मरणिकेचे प्रकाशन  तसेच  अरविंद शिंगाडे लिखित  'सूत्रसंचालनाची सूत्रे' या  ई-बुकचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.  चंद्रशेखर जोशी  व  पूजा काळे  या सत्राचे  सूत्रसंचालन  करतील व  उमाकांत कांडेकर  आभार मानतील.
      उद्घाटन समारंभा अगोदर ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाचा शुभारंभ होणार असून, बुलडाण्याचे उपवनसंरक्षक मा.   संजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत  व नायब तहसीलदार योगेश देशमुख  यांचेसह  शहरातील  शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य - प्राध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी  ,साहित्यिक, पत्रकार  व  विद्यार्थी तसेच  साहित्यप्रेमी नागरिकांची उपस्थिती राहील.

Web Title: State level youth Marathi Sahitya Sammelan on January 20 in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.