एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:28 AM2017-10-18T01:28:26+5:302017-10-18T01:28:43+5:30

बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर  मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप  सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट  दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची दाणादाण  उडाली आहे.

ST employees strike due to the turmoil of passengers! | एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा!

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा!

Next
ठळक मुद्दे५0 लाखांचा महसूल बुडाला जिल्ह्यातील १९५0 कर्मचारी संपात सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर  मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप  सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट  दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची दाणादाण  उडाली आहे. या संपात जिल्ह्यातील १,९५0 कर्मचारी सहभागी  झाले असून, मंगळवारी संध्याकाळपर्यंत एसटी महामंडळाने  जवळपास २ लाख किलोमीटर प्रवास रद्द केल्यामुळे ५0 लाख  रुपयांचा महसूल बुडाण्याची माहिती आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यासाठी  एसटी मान्यताप्राप्त संघटनेने संपाची हाक दिली. त्यामुळे एसटी  महामंडळाचा संप सोमवारी रात्री १२ वाजेपासून सुरू झाला. या  संपात बुलडाणा जिल्ह्यातील २,५00 कर्मचार्‍यांपैकी कामावर  येणार्‍या १,९५0 कर्मचारी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यात  सकाळी १६ एसटीच्या फेर्‍या झाल्यानंतर एकही एसटी बसस् थानकाबाहेर पडली.  त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जवळ पास २ लाख किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्यामुळे ५0 लाखांचा  महसूल बुडाल्याची माहिती आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचा  संप असल्यामुळे प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर केला. काही  प्रवाशांची खासगी गाड्यांद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सं प असल्यामुळे प्रत्येक बसस्थानकावर एसटी महामंडळाच्या  सुरक्षा रक्षकासह पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.  त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर शुकशुकाट दिसून  आला.
बुलडाणा बसस्थानक परिसरात संपात सहभागी झालेल्या एसटी  कर्मचार्‍यांची सभा पार पडली. यावेळी एसटी कर्मचार्‍यांनी आ पले मनोगत व्यक्त करून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू  ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रीय ईपीएस ९५ नवृत्त  कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी  मार्गदर्शन करून पाठिंबा दिला. तसेच मागण्या मान्य होईपर्यंंत सं प सुरू ठेवण्याचे आवाहन केले.   

एसटी संपामुळे प्रवाशांची गैरसोय
चिखली: प्रवाशांच्या सेवेसाठी असे अभिमानाने बिरूद  मिरविणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी  आपल्या मागण्यांसाळी १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्नीपासून  पुकारलेल्या संपाचे पडसाद १७ ऑक्टोबर रोजी दिसून आले.  ऐन दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारल्यामुळे स्थानिक चिखली  आगारात प्रवाशांना विविध संकटांचा सामना करावा लागला. तर  दुसरीकडे एसटीच्या संपाचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूक  करणार्‍यांनी आपले उखळ पांढरे करून घेत प्रवास भाड्यात वाढ  केल्याने प्रवाशांची आर्थिक लूट होत असून, याचा सर्वाधिक  फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. तर संपामुळे नेहमी  गजबजलेल्या बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येत होता.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उन्हाळी सुट्यांपेक्षा अधिक  उत्पन्न हे दिवाळीच्या सुट्यांमध्ये मिळते. दिवाळी सणाला  प्रवाशांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात असते. एसटीला राज्याची  नस म्हटल्या जाते व एसटीने राज्यातील कानाकोपर्‍यात आपले  जाळे विणले आहे; मात्र संपामुळे हे जाळे विस्कळीत झाले  असून, याचा प्रचंड फटका व प्रवाशांना बसत असून, मोठय़ा  असुविधेचाही सामना करावा लागत आहे. तर संपामुळे प्रवाशांना  खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे; मात्र त्याचा  लाभ घेत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी प्रवास भाड्यात  वाढ केली असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत असला  तरी नाइलाजाने त्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत  होता. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या वाहनातून नेल्या जात  असल्याने याचाही त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. 

खामगाव आगाराचे सात लाखांचे नुकसान!
खामगाव:  वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन  महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत सं पाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. या संपामुळे  एसटीचे कामकाज ठप्प झाले असून, २0 हजार किलोमीटरच्या  ५२ फेर्‍या रद्द झाल्याने, खामगाव आगाराचे सुमारे सात लाख रु पयांचे पहिल्याच दिवशी नुकसान झाले. परिणामी, परिसरात  खासगी वाहतुकीने तोंड वर काढले असून, दिवाळीच्या गर्दीचा  लाभ या वाहतुकीला होत असल्याचे दिसून येते. एसटी  कर्मचार्‍यांच्या संपामुळे खामगाव आगारातून एकही बस  आगाराच्या बाहेर पडली नाही. परिणामी, बसस्थानकावरही  चांगलाच शुकशुकाट दिसून आला. बसस्थानकावर ताटकळत  असलेले प्रवासी मिळेल त्या वाहनाने जाण्याचा मार्ग शोधत होते.  एसटीच्या संपाचा मुहूर्त साधत खासगी वाहनधारकांनी आपल्या  प्रवासभाड्यात १0-२0 टक्के भाडेवाढ केल्याचे दिसून आले.  नाइलाजाने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. ऐन  दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा चांगलाच फायदा,  खासगी प्रवासी वाहतुकीला झाल्याचे चित्र दिवसभर खामगाव  बसस्थानकावर होते. दरम्यान, संपामुळे बसस्थानकावरील  बसस्थानक प्रमुखांच्या कक्षाला कुलूप होते. तर चौकशी कक्षही  दिवसभर ओस पडला होता. तर बसस्थानकावर दिवसभर  शुकशुकाट दिसून आला.

Web Title: ST employees strike due to the turmoil of passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.