सैलानी यात्रेमुळे एसटी महामंडळ मालामाल; ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:27 PM2018-03-09T17:27:28+5:302018-03-09T17:27:28+5:30

बुलडाणा : सैलानी यात्रेदरम्यान, राज्य परिवहन महामंडळाला सुमारे ५९ लाख ३६ हजार ७८४ रुपयांचे उत्पन्न गेल्या आठ ते दहा दिवसात मिळाले आहे.

ST corporation merchandise due to tourist visits; 5.9 million received income | सैलानी यात्रेमुळे एसटी महामंडळ मालामाल; ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न  

सैलानी यात्रेमुळे एसटी महामंडळ मालामाल; ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न  

Next
ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेला १ मार्च पासून सुरूवात झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने यात्रेच्या दोन दिवस आधीपासूनच म्हणजे २६ फेब्रुवारीपासून जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.२६ फेब्रुवारीपासून आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत ५९ लाख ३६ हजार ७८४ रुपयांचे उत्पन्न पडले आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : सैलानी यात्रेदरम्यान, राज्य परिवहन महामंडळाला सुमारे ५९ लाख ३६ हजार ७८४ रुपयांचे उत्पन्न गेल्या आठ ते दहा दिवसात मिळाले आहे. दरम्यान, या कालावधीत प्रवाशी भारमानही ७९.७४ टक्के होते. जवळपास ११ मार्च पर्यंत यात्रा स्पेशल बसगाड्या धावणार असल्याने या उत्पन्नात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेला १ मार्च पासून सुरूवात झाली आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावतात. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने यात्रेच्या दोन दिवस आधीपासूनच म्हणजे २६ फेब्रुवारीपासून जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. सैलानी येथे तीन तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले असून बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहे. सैलानी यात्रेसाठी पिंपळगाव सराई परिसरात गट ३८३ आणि पिंपळगाव सराई ते भडगाव मार्गावर गट नंबर १२०/१२९ तसेच ढासाळवाडी गट नंबर ३६६ मध्ये बसस्थानकांची उभारणी राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून सैलानी यात्रेसाठी जादा बसफेºया उपलब्ध करण्यात आल्याने २६ फेब्रुवारीपासून आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत ५९ लाख ३६ हजार ७८४ रुपयांचे उत्पन्न पडले आहे. एसटी महामंडळाचे एकुण १ लाख ६१ हजार १४७ किलो मिटर झाले असून, प्रति कि़मी.चे उत्पन्न ३६.८० टक्के राहिले आहे. तर या कालावधीत प्रवाशी भारमान ७९.७४ टक्के राहिले आहे. त्यामध्ये बुलडाणा आगाराचे २८ हजार १५७ किलो मीटर झाले असून, ९ लाख ४७ हजार ६५१ रुपये उत्पन्न मिळाले आहे. चिखली आगाराचे ३६ हजार ६४५ किलो मीटर झाले असून, १४ लाख ७७ हजार ८८८ रुपये उत्पन्न मिळाले आहे. खामगाव आगाराचे १० हजार ५६ किलो मीटर व २ लाख ५८ हजार ८८९ रुपये उत्पन्न मिळाले आहे. मेहकर आगाराचे १८ हजार ४३० किलो मीटर व ७ लाख ४ हजार ९६१ रुपये उत्पन्न मिळाले आहे. मलकापूर आगाराचे ५४ हजार ६७६ किलो मीटर व २१ लाख ३१ हजार ७९१ रुपये उत्पन्न मिळाले आहे. जळगाव जा. आगाराचे ९ हजार ७३२ किलो मीटर व ३ लाख १२ हजार ८७२ रुपये उत्पन्न मिळाले आहे. शेगाव आगाराचे ३ हजार ४५१ किलो मीटर व १ लाख २ हजार ७३२ रुपये उत्पन्न मिळाले आहे. यात्रा स्पेशलच्या बसफेºया आणखी दोन ते तीन दिवस राहणार असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यत सुत्रांनी वर्तवली आहे.

१ मार्च ठरला उत्पन्नाचा दिवस

सैलानी यात्रेत १ मार्चला होळीनिमित्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे यात्रेच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये १ मार्च हा राज्य परिवहन महामंडळासाठी सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस राहिला आहे. १ मार्चला २० हजार ७९६ कि़मी. झाले असून ८ लाख ५० हजार ६८६ रुपये उत्पन्न राज्य परिवहन महामंडळाला मिळाले आहे. यामध्ये प्रवाशी भारनाम ७९.३१ टक्के राहिला.  

Web Title: ST corporation merchandise due to tourist visits; 5.9 million received income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.