Sindkhedraja: On the occasion of Jijau Janmotsava, all the three descendants of Shivrajaya are on the same pageant! | सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने शिवरायांचे तीनही वंशज एकाच विचारपीठावर!
सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने शिवरायांचे तीनही वंशज एकाच विचारपीठावर!

ठळक मुद्देसातार्‍याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेकोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले तामिळनाडूतील तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसलेजिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने एकाच विचारपिठावर येण्याचा हा योग

सिंदखेडराजा : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन वशंज  एकाच वेळी मातृतिर्थावरील ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवास  आवर्जून हजर होते. कौटुंबिक कार्यक्रमासाठी गाठी भेटी होत असल्या तरी सामाजिक  विचारांचे मंथन    होत असलेल्या या कार्यक्रमात प्रथमच त्यांचे एकत्र  येणे  ही  महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
सातार्‍याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती खासदार  संभाजीराजे भोसले आणि तामिळनाडूतील तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसले हे  जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने एकाच विचारपिठावर येण्याचा हा योग होता. खुद्द छत्रपती  संभाजीराजे भोसले यांनी ही बाब  बोलून दाखवली. एका ठिकाणी एकाच विचारपिठावर  पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचे तिनही वंशज एकत्र आले. सार्वजनिक  कार्यासाठी ते एकत्र आले ही महत्त्वाची घटना आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्ली ते  जिंजी असा दबदबा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २0१८  रोजी थेट दिल्लीमध्ये साजरी करण्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  यावेळी केली. त्यासाठी राज्यातील खासदारांनी तयार रहावे, त्यात लक्ष घालावे, असे  आवाहनही त्यांनी केले. सोबतच सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मोर्चांची  दखल केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली असल्याचे त्यांनी आवर्जून  सांगितले. छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाचा इतिहास तंजावरमध्ये जिंवं त ठेवण्यात आला असून आपल्या सर्वांचा  हा इतिहास आहे, असे प्रतिपादन केले.  तंजावरमध्ये आपली संस्कृती जोपासल्या गेली असल्याचे ते म्हणाले. उदयनराजे भोसले  म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे विचारच  देशाला तारू शकतात.

अद्ययावत ग्रंथालयासाठी ५0 लाख
जिजाऊ सृष्टीवर अद्ययावत ग्रंथालय तयार केले जावे. त्यासाठी आपण ५0 लाख रुपये  देऊ. या ग्रंथालयाचे काम  सुरू व्हावे, अशी अपेक्षा छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले  यांनी व्यक्त केली. दरम्यान, किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने प्राप्त निधीतंर्गत जिजाऊ  सृष्टीचाही समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू, असे मतही छत्रपती संभाजीराजे  भोसले यांनी यावेळी बोलतना व्यक्त केले.


Web Title: Sindkhedraja: On the occasion of Jijau Janmotsava, all the three descendants of Shivrajaya are on the same pageant!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.