मालमत्ता आॅनलाईन करण्यात शेगाव तालुका पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:05 PM2018-07-06T14:05:36+5:302018-07-06T14:08:35+5:30

शेगाव : राज्यामधे प्रत्येक शासकीय कार्यालयात आॅनलाइन प्रक्रिया २०१६ मधे सक्तीची करण्यात आल्यानंतर शेगाव तालुक्यात मात्र या दोन वर्षात ४७ हजार ५०० मालमत्तांपैकी केवळ ७ हजार मालमत्ताच  आॅनलाइन होवू शकल्या आहेत.

Shegaon trail behind in property online | मालमत्ता आॅनलाईन करण्यात शेगाव तालुका पिछाडीवर

मालमत्ता आॅनलाईन करण्यात शेगाव तालुका पिछाडीवर

Next
ठळक मुद्देमागील दोन वषार्पुर्वी शासनाने मोठा गाजावाजा करत प्रत्येक विभाग आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला. मालमत्ता अजूनही नविन नावावर चढत नसल्याने संगणकाद्वारे  अजूनही जुन्याच् मालकाच्या नावाचा  सातबारा निघत आहे.आॅनलाईनची कामे लवकर पुर्ण करावी तसेच मालमत्ताधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

- विजय मिश्रा
 
शेगाव : राज्यामधे प्रत्येक शासकीय कार्यालयात आॅनलाइन प्रक्रिया २०१६ मधे सक्तीची करण्यात आल्यानंतर शेगाव तालुक्यात मात्र या दोन वर्षात ४७ हजार ५०० मालमत्तांपैकी केवळ ७ हजार मालमत्ताच  आॅनलाइन होवू शकल्या आहेत.
शेतकरी, मालमत्ताधारक या आॅनलाइन प्रक्रियेने बेजार झाला आहे.     मागील दोन वषार्पुर्वी शासनाने मोठा गाजावाजा करत प्रत्येक विभाग आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भ्रष्टाचाराला पायबंद बसणार असल्याचेही सांगण्यात आले. परन्तु आता दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही हे काम पुर्ण होताना दिसत नाही. मालमत्ता धारकांनी दोन वषार्पुर्वी विकलेली मालमत्ता अजूनही नविन नावावर चढत नसल्याने संगणकाद्वारे  अजूनही जुन्याच् मालकाच्या नावाचा  सातबारा निघत आहे.  विविध कामांच्या निमित्ताने आॅनलाईन सातबाºयाची मागणी केल्या जात असून यात अपडेट नसल्याने त्रास होत आहे. दुसरीकडे  तलाठी हस्तलिखीत सातबारा देत नाहीत. यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  याबाबत अनेकांनी तहसील कार्यालयात तक्रारी केल्या आहेत,  परन्तु अधिकारी मात्र फक्त शासनाचा आदेश म्हणुन कानावर हात ठेवत आहेत. यातून  खरेदीविक्रीबाबत अनेक अडचणी निर्माणा झाल्या आहेत. काही प्रकरणे न्यायालयातही पोहचली आहेत. या पेचात  शेगाव येथील व्यापारी हरीश मानकलाल सलामपुरिया याच्या काही मालमत्ता असून त्यांनी अर्ज करून  मालमत्ता वाचविन्याची विनती केली आहे. दुसरीकडे मंडळ अधिकारी आपले  आॅनलाइन काम पुर्ण झाल्याचे  सांगतात.  मग नविन मालकाच्या नावाने  सातबारा का निघत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर  विचारणा केल्यास आॅनलाइनच्या तिसºया टप्प्याचे काम (डिजिटल सिग्निचर पोर्टल) पूर्ण नसल्याने हा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना मागील दोन वर्षात आॅनलाइन झालेल्या ७ हजार  मालमत्ता या कशा आॅनलाइन झाल्या असा प्रश्नही निर्माण होत आहे. याचे उत्तर देण्यास कुणीही तयार नाही.  अनेकांची कामे रखडल्याने  आॅनलाइन काम पुर्ण होईपर्यंत हस्तलिखित सातबारे देण्याची मागणी केली असता, आॅनलाईन काम झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नागरीकांची कामे खोळंबली  आहेत. अशा अवस्थेत मालमत्ताधारकांनी  आपल्या मालमत्ता जुन्या सातबाºयावर विक्री होण्यापासून कशा वाचवायच्या असा पेच निर्माण झाला आहे. असे असले तरी याप्रकियेत लाचखोरीचे प्रमाणही वाढले आहे. ज्यांनी पैसे खर्च करायची तयारी ठेवली, त्यांची कामे अडत नसल्याचेही दिसते. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आॅनलाईनची कामे लवकर पुर्ण करावी तसेच मालमत्ताधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.  (प्रतिनिधी)

Web Title: Shegaon trail behind in property online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.