सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:55 AM2017-11-07T00:55:13+5:302017-11-07T00:55:27+5:30

पोहरादेवीच्या विकास आराखड्यासाठी १00 एकर क्षेत्रावर ९0  कोटी रुपये शासनाने मंजूर केले. ‘शिवसेनेला साथ द्या, आम्ही  विकासात्मक कामे करू’, असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय राठोड  यांनी केले.

Sanjay Rathod has been doing a lot of development work in Sindhkhedra during three years | सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड

सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड

googlenewsNext
ठळक मुद्दे६00 तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : कोणत्याही जाती, धर्माचा विचार न करता  सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काम करण्याचा वसा बाळासाहेब  ठाकरे यांनी दिला. शिवसेनेची भूमिका सत्तेपेक्षा जनतेसोबत आहे.  गेल्या वीस वर्षात सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचा आ िर्थक विकास झाला नाही तेवढा विकास आ. शशिकांत खेडेकर  यांनी केला, त्यामुळे बंजारा समाजासह इतर समाजातील ६00  तरुणांनी संदीप पवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला.  पोहरादेवीच्या विकास आराखड्यासाठी १00 एकर क्षेत्रावर ९0  कोटी रुपये शासनाने मंजूर केले. ‘शिवसेनेला साथ द्या, आम्ही  विकासात्मक कामे करू’, असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय राठोड  यांनी केले.
   ५ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील बंजारा समाजासह  इतर ६00 तरुणांनी संजय राठोड, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,  खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,  आ.संजय रायमुलकर, विलास काकडे, भास्करराव आंबेकर,  जालींधर बुधवत, ऋषी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत  जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्र्यांसह सर्व  मान्यवरांनी ढोल ताशाच्या गजरात राजवाड्यात जावून जिजाऊ  मासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर वाजतगाजत सर्व जण नगर  परिषदेच्या सभागृहात येताच बंजारा समाजाच्या माता-भगिनींनी  मान्यवरांना ओवाळले. मान्यवरांच्याहस्ते थोर महात्म्यांना पुष्पहार  घालून वंदन केले. सर्व मान्यवरांचा भगवे फेटे, शाल, o्रीफळ  पुष्पहार देऊन सत्कार झाला. त्यानंतर ६00 तरुणांना भगवे रूमाल  घालून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. ्रप्रास्ताविक आमदार  डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केले. मतदार संघामध्ये २0 वर्षातील  रखडलेल्या विकास कामाला गती देऊन ८0 टक्के रस्त्याची कामे  पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला. जलयुक्त  शिवाराची कामे मोठय़ा प्रमाणात केली. आमना नदीचे रूंदीकरण,  खोलीकरण, ३00 सौर ऊर्जा पंप मंजूर, दोन्ही बसस्थानकाला  संरक्षण भिंती, महामार्गासाठी अडीचशे कोटीचा निधी,  जिजाऊंच्या विकास आराखड्यासाठी ३00 कोटीचा निधी मंजूर  करून बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा  संकल्प जाहीर केला. खा.प्रतापराव जाधव म्हणाले की, काँग्रेस,  राष्ट्रवादीने केलेल्या हजारो कोटीचे घोटाळे करून देशाला  डबघाईस नेले म्हणून जनतेने नरेंद्र मोदीचे सरकार आणले; परंतु  मोदीने नोटाबंदी केल्यामुळे, शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव पडले.  शेतकरी कर्जबाजारी झाला. गरिबांना गॅस कनेक्शन दिले; परंतु  गॅसची सबसिडी काढून घेतल्यामुळे गरिबांना गॅसशेगडी  विकण्याची वेळ आली. कर्जमाफीची घोषणा पोकळ निघाल्याचे  सांगून शिवसेनेला मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी  संजय मेहेत्रे, आत्माराम कायंदे, अतिश तायडे, सतीश काळे, दी पक बोरकर, गोविंद झोरे, दिलीप आढाव, प्रकाश मेहेत्रे, शिंपणे,  दादाराव खार्डे, काकडेसह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Sanjay Rathod has been doing a lot of development work in Sindhkhedra during three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.