शेगावात प्लास्टिक बंदीची कारवाई; किराणा दुकानदाराला ५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:29 PM2018-07-02T17:29:17+5:302018-07-02T17:32:18+5:30

शेगाव : शेगाव नगर परिषदच्यावतीने २ जुलै रोजी प्लास्टिक बंदी संदर्भात मोहिम जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानात प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजेल जप्त करुन ५००० रुपये दंड आकारण्यात आला. 

 Plastic ban imposed; The grocery store gets 5 thousand bars | शेगावात प्लास्टिक बंदीची कारवाई; किराणा दुकानदाराला ५ हजाराचा दंड

शेगावात प्लास्टिक बंदीची कारवाई; किराणा दुकानदाराला ५ हजाराचा दंड

Next
ठळक मुद्देजुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजल वस्तु जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये ५००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही शेगावातील दंडात्मक पहिलीच कारवाई झाली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव नगर परिषदच्यावतीने २ जुलै रोजी प्लास्टिक बंदी संदर्भात मोहिम जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानात प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजेल जप्त करुन ५००० रुपये दंड आकारण्यात आला. 
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनावर बंदी संदर्भात महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशिल वस्तुचे उत्पादनावर, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक अधिसूचना २०१८ दि.२३ मार्च २०१८ अन्वये जारी केलेल्या आहे. त्यानुसार २ जुलैरोजी शेगाव नगर परिषदेचे पथकाने मेनरोडवरील जुगलकिशोर शंकरलाल बजाज यांचे किराणा दुकानातून प्लास्टिक पिशव्या व डिस्पोजल वस्तु जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये ५००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही शेगावातील दंडात्मक पहिलीच कारवाई झाली आहे. तसेच बºयाच व्यावसायीकांना नागरिकांना समज देण्यात आले. न.प.चे मुख्याधिकारी अतूल पंत यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकामध्ये नागेश रोठे, पथक प्रमुख, चेतन ढेवले, पी.आर. हातेकर, संजय भोसले, भारत मोहिदे, समाधान जायभाये, रवि सारवार, एस.पी. मिश्रा यांनी काम पाहिले.

Web Title:  Plastic ban imposed; The grocery store gets 5 thousand bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.