शेतमाल खरेदीच्या आॅनलाइन नोंदणीची मुदत चार दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 05:32 PM2018-11-26T17:32:14+5:302018-11-26T17:32:24+5:30

बुलडाणा : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार आहे.

 The period of online registration for the purchase of commodity | शेतमाल खरेदीच्या आॅनलाइन नोंदणीची मुदत चार दिवसांवर

शेतमाल खरेदीच्या आॅनलाइन नोंदणीची मुदत चार दिवसांवर

Next

बुलडाणा : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार आहे. या खरेदी केंद्रासाठी शेतकºयांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाइन नोंदणीला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकºयांच्या हातात केवळ चार दिवस उरले असून आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे.
यावर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामात पाहिजे तेवढे उत्पादन शेतकरी घेऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांना सोयाबीन, मुंग, उडीद उत्पादनात फटका बसला. त्यातही व्यापाºयांकडून भाव मिळत नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी भावात शेतमाल विक्री करावा लागतो. परिणामी शेतकºयांना उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकºयांना योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्यात येत आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार असून खरेदी केंद्रासाठी शेतकºयांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. या नोंदणीला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. सोयाबीन शेतमालाचा आधारभुत दर ३ हजार ३९९ क्विंटल आहे. नोंदणीकरीता आधारकार्डची छायांकित प्रत व विक्रीस आणलेल्या शेतमालाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करणे गरजेचे आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर पर्यंत आॅनलाईन नोंदणी सुरू होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी आॅनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. त्यासाठी नोंदणी कालावधीला मुदतवाढ देण्यात आली असून ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.


एसएमएसद्वारे मिळणार शेतमाल विक्रीची माहिती
शेतमालाच्या आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांना आपला मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर देणे आवकश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमावारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
 

 

Web Title:  The period of online registration for the purchase of commodity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.