पॅसेंजर रेल्वेगाड्या १८ जुलैपासून होणार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:07 PM2019-07-17T16:07:32+5:302019-07-17T16:07:37+5:30

शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून  पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

Passenger trains will be resume from 18th July | पॅसेंजर रेल्वेगाड्या १८ जुलैपासून होणार पूर्ववत

पॅसेंजर रेल्वेगाड्या १८ जुलैपासून होणार पूर्ववत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून  पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
१८ जुलैपासून भुसावळ-वर्धा-भुसावळ पॅसेंजर सुरू होणार आहे. 18 जुलै रोजी ५११९७ ही पॅसेजर भुसावळ येथून दुपारी २.३० वाजता सुटणार असून ही गाडी दुपारी ४.४० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ५११९८ ही गाडी १८ जुलै रोजी वर्धा येथून रात्री ११ वाजता सुटेल व सकाळी ५.१५ वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचेल. त्याचप्रमाणे भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी १८ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल व ९.३६ वाजता शेगाव स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ही गाडी २० जुलै रोजी नागपूर येथून परतीच्या मार्गावर सकाळी ४.५० वाजता सुटून शेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ११.३० वाजता पोहचण्याची वेळ आहे. या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पुर्ववत सुरू होत असल्याने प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामूळे एक्सप्रेस गाड्यांच्या रिझर्वेशनच्या डब्ब्यात होणारी गर्दी कमी होणार असून गरीबांची पैशांची बचतही होणार आहे.
तर पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरू व्हाव्यात, याकरीता खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाला पत्र लिहुन जनतेची सवारी कोणतेही कारण न देता लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असे सुचविले होते. खा. जाधव यांच्या पत्राला अनूसरून येत्या १८ जुलै पासून दोन्ही पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरू होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Passenger trains will be resume from 18th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.