शासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 04:43 PM2018-10-19T16:43:57+5:302018-10-19T16:44:18+5:30

बुलडाणा: राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून आॅनलाइन खरेदी करण्यात येत आहे.

Online purchase of government godowns thraids bundle | शासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदी    

शासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदी    

Next

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून आॅनलाइन खरेदी करण्यात येत आहे. शासकीय गोदामांना दोन महिने पुरेल एवढ्या सुतळी गाठी शासनाच्या आॅनलाइन पोर्टलद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून १६ हजार ५०० रिळ धाग्याचा गोदामामध्ये पुरवठा सुरू झाला आहे. 
शासकीय कार्यालयातील विविध वस्तुंची खरेदी प्रक्रिया सुलभ व गतीमान व्हावी, यासाठी शासनाने सुरू केलेल्या गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या आॅनलाइन पोर्टलवरच आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवर सुचना स्थानिक कार्यालयांना येत आहेत. राज्यातील शासकीय धान्य गोदामांमाध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या पोर्टलद्वारे खरेदी करण्यात येत आहे. शासकीय गोदामांमध्ये अन्नधान्याच्या पोत्यांचे प्रमाणिकरण केल्यानंतर ती शिवण्यासाठी वीज उपलब्ध असलेल्या राज्यातील ५५० गोदामांसाठी १ हजार १०० पोती शिवण यंत्रे, हँगींग हूक व शिवण यंत्रासाठी लागणारा १६ हजार ५०० रिळ धागा यांची खरेदी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्याचा संबंधीत गोदामामध्ये पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित शासकीय गोदामांना दोन महिने पुरेल एवढ्यसा सुतळी गाठी गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस या पोर्टलवर खरेदी करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. शासकीय धान्य गोदामामध्ये पोती, सुतळीगाठी वेळेवर मिळत नसल्याने येणाºया अडचणी आॅनलाइन खरेदी प्रक्रियेने दूर होत आहेत. 


तीन टक्के अनामत रक्कम
खरेदी मुल्याच्या तीन टक्के अनामत रक्कम करारनाम्यासोबत धनाकर्षद्वारे वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे नावे जमा करावी लागेल, अशी तरतुद करण्यात आली आहे.  अनामत रक्कम, बँकेची कार्यवाही यासर्व प्रक्रियेनंतर ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा सुरू होऊ शकेल. 

यांना करावी लागणार कार्यवाही
शासकीय धान्य गोदामातील सुतळीगाठीची आॅनलाइन खरेदीची संपूर्ण कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी, नियंत्रक, शिधावाटप, वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना करावी लागणार आहे. पुरवठादाराने सुतळी गाठींचा पुरवठा संबंधित जिल्हा गोदामामध्ये केल्यानंतर सामुग्री स्विकारणाºया जिल्हा पुरवठा कार्यालयाने त्याच दिवशी गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवर आर्डर नंबर व इतर बाबी नमुद कराव्या लागणार आहेत.


शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी लागणाºया सुतळीगाठीची गव्हर्मेंट ई-  मोर्केटप्लेसवरून खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. आॅनलाइन पोर्टलमुळे खरेदीची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
- बी. यू. काळे, 
जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Online purchase of government godowns thraids bundle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.