ठळक मुद्देटायर फुटल्याने परडा फाट्याजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : मोताळा तालुक्यातील खरबडी येथे स्थळासाठी आलेल्या वर  पक्षाच्या व्यक्तींच्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये  कारमधील एक जण जागीच ठार झाला तर सात जण जखमी झाले आहेत.  यातील एकास औरंगाबाद तर अन्य सहा जणांवर बुलडाणा जिल्हा  सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर ये थील एका युवकाचा मोताळा तालुक्यातील खरबडी येथील युवतीशी  विवाह ठरला होता. त्यांचा शुक्रवारी साखरपुडा होता. त्यानुषंगाने जामनेर  येथून काही युवक सफारी कार क्रमांक एमएच-२0-बीजी-२७७७ द्वारे  खरबडीला जात होते. वाघजाळलगत असलेल्या परडा फाट्यावर दुपारी  एक वाजेच्या सुमारास या कारचे टायर फुटले, त्यामुळे चालकाचे  वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाने चार ते पाच पलटी खाल्ली. यामध्ये  त्यातील शेख शाहरूख शेख खालीद याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  दरम्यान, शेख कलीम शेख शब्बीर पिंजारी, शेख आसीफ सुपडू पिंजारी,  खालीद खान शौकत खान, शेख शाहरूख शेख रफीक, रहीम शाह नजीर  शाह, शेख सादीक शेख बुढन आणि शेख नदीम शेख नईम हे जखमी  झाले. जामनेर येथील ते रहिवाशी आहेत. 
त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  शेख शाहरूख शेख खालीदला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी शेख  शाहरूख शेर रफीक याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास औरंगाबाद येथे  हलविण्यात आले. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.